रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ramlalla Pranpratistha) होण्याआधीच अयोध्या राममय झाली आहे. रामभक्तांचे उत्साहाचे वातावरण आहे. प्रभु श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत 2500 लोककलाकार दाखल झाले आहेत. अयोध्येत 100 ठिकाणी कार्यक्रमाकरिता व्यासपीठाची उभारणी सुरू आहे. येथे कलाकारांच्या कलेचं सादरीकरण होणार आहे. उत्तर प्रदेश संस्कृति विभागाकडून राम मंदिर उद्घाटनासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य स्वागताकरिता विशेष तयारी सुरू आहे.
हा कार्यक्रम भव्यदिव्य, अविस्मरणीय व्हावा, त्याला व्यापक रूप प्राप्त व्हावे, यासाठी सांस्कृतिक विभागाकडून नृत्य, संगीतविषय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामाचा जन्म त्रेतायुगात झाला. या युगाचे वैभव अयोध्येत प्रदर्शानाद्वारे साकरले जाणार आहे. रविवारी कार्यक्रमानिमित्त कलाकारांची तालीम सुरू आहे. सुरक्षिततेसाठी लोकांची घरे, इमारती अयोध्येत गल्लोगल्ली पोलिसांचा पहारा असणार आहे.
(हेही वाचा – Ram Mandir Pranpratistha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ हजार प्रसादाचे बॉक्स तयार; काय आहे वैशिष्ट्य ? जाणून घ्या)
पाहुण्यांना रामतीर्थ ट्रस्टकडून विशेष प्रसाद …
- प्राणप्रतिष्ठा समारंभात आमंत्रित पाहुण्यांना मिळणारा प्रसाद विशेष असेल. ट्रस्टने पाहुण्यांसाठी प्रसादाची 15 हजार पाकिटे तयार केली आहेत. यामध्ये गूळ, रेवडी आणि रामदाण्यांची चिक्की आहे. प्रसादात अक्षता असतील. याशिवाय तुळशी दल आणि वेलचीचे दाणेही आहेत.
- सध्या रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे दिले जातात. त्यामुळे त्याचाही प्रसादात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रक्षासूत्र, ‘राम दिया’ देखील असेल. लखनौच्या छप्पन भोगकडून प्रसादाची ही पाकिटे तयार केली आहेत.
लोकांच्या भावना रामललापर्यंत पोहोचवण्याकरिता…
यासोबतच अयोध्येत यात्रा धामतर्फे राम मंदिराचा बोर्ड लावण्यात आला आहे. यामध्ये लोक राम मंदिराबाबतच्या भावना स्टिक पेपरवर लिहित आहेत. 22 जानेवारीनंतर हे सर्व स्टिक पेपर राम मंदिराकडे सुपूर्द केले जातील, असे संघटनेचे म्हणणे आहे. याद्वारे लोकांच्या भावना रामललापर्यंत पोहोचतील, अशी भावना आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community