रणबीर कपूरसाठी ‘बीफ’ ठरला काळ

रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी त्याला बीफ आवडतं असं विधान केलं होतं. आता तो उज्जैन येथील महाकाळ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला असताना काही लोकांनी त्याच्या विरोधात निदर्शने केली. पोलिसांनी जरी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली असली तरी रणबीरला महाकाळ मंदिरात प्रवेश करता आला नाही. म्हणूनच बीफ संबंधित विधान रणबीरसाठी काळ ठरला आहे.

( हेही वाचा : श्रीमद्‍भगवद्‍गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा…)

बॉलिवूडने केलेली जुनी पापं आता बाहेर येत आहेत. पूर्वी सोशल मीडिया नव्हता तेव्हा लोक काहीही विधानं करायचे आणि लोकांवर फारसा परिणाम व्हायचा नाही. चित्रपटातील हिरो हीरोइनला लोक आपला आदर्श मानत असत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक आसुसलेले असत. आता मात्र काळ बदललेला आहे. लोक सुजाण झाले आहेत. कुणीतरी म्हटलं आहे ना की, सर्व लोकांना तुम्ही सर्वकाळ मूर्ख नाही बनवू शकत. भारताबाहेर गेल्यावर तुम्ही उंदराचं मांस खाल्ल तरी कुणाला काय फरक पडणार आहे? पण भारतात बहुसंख्य हिंदू गाईला माता मानतात, त्यास प्रत्युत्तर करताना बैलाला बाप म्हणणार का असला पांचट सवाल उभा करतात.

रणबीरला मंदिरात प्रवेश घेऊ दिला नाही तर भाविकांचं काय चुकलं?

वीर सावरकरांनी गाईला उपयुक्त पशू म्हटले होते, त्यामागे त्यांची भावना उदात्त होती. हिंदू पराकोटीचे अहिंसक व पर्यायाने निष्क्रिय झाले होते. त्यांच्यात लढण्याची धमक उरली नव्हती. म्हणून वीर सावरकर म्हणाले गाईची पूजा करता करता हिंदुंची पण गाय झाली आहे. त्यापेक्षा वाघाची अथवा सिंहाची पूजा केली तर देवाचे गुण भक्तात उतरतील. अशी वीर सावरकरांची भावना होती. परंतु वीर सावरकरांना सतत विरोध करणार्‍या, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करणार्‍या स्वयंघोषित पुरोगाम्यांना त्यांचं गाईसंबंधित विधान चघळायला फार आवडतं. परंतु त्यामागची भावना कोण लक्षात घेणार?

भारतात राहून हिंदुंच्या भावना सदैव पायदली तुडवल्या जातात. ते बॉलिवुडचे कलाकार तर हिंदुंच्या पैशांवर श्रीमंत होतात आणि हिंदुंच्याच श्रद्धास्थानांचा अपमान करतात. मग रणबीरला मंदिरात प्रवेश घेऊ दिला नाही तर भाविकांचं काय चुकलं?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here