महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांसहित कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा

128

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासाठी येत्या ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोअर परळ (पूर्व) परिसरातील ना. म. जोशी मार्गावर असणा-या महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित होणा-या या स्पर्धेत ३ गट असणार असून तिन्ही गटांसाठी रोख रकमेची स्वतंत्र पारितोषिके आहेत.

(हेही वाचा – ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)

या अंतर्गत पहिला व दुसरा गट हा महानगरपालिका कर्मचारी व महानगरपालिका शिक्षकांसाठी असून, यासाठी अनुक्रमे समकालीन रांगोळी व पारंपारिक रांगोळी असा विषय आहे. तर तिसरा गट हा महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असून यासाठी ‘मुक्त रांगोळी’ असा विषय आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

रांगोळी स्पर्धेसाठी मर्यादित प्रवेश असल्याने प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून यासाठीच्या प्रवेशिका या दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी करीरोड (पूर्व) येथील कला अकदमीत कार्यरत असलेले निनाद पाटील यांना ९८६७८०८६५० या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा WhatsApp करावे किंवा kalaakademy@gmail.com या मेल आयडी वर ईमेल करावा.

या स्पर्धेत तिनही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तिनही पारितोषिके असून या व्यतिरिक्त ११ उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. या स्पर्धेनंतर स्पर्धेच्याच ठिकाणी दिनांक १२ ते १८ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीदरम्यान रांगोळी प्रदर्शन आयोजित केले जाणार असून हे सर्वांसाठी खुले असणार आहे, असेही मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.