लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर या झाशीची राणी या नावाने ओळखल्या जातात. राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) या मराठा साम्राज्यातले झाशी संस्थानचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या पत्नी होत्या. तसंच १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्यसमरामधल्या त्या एक प्रमुख व्यक्ती होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध कडवा प्रतिकार केला.
राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांचा जन्म १९ नोव्हेंबर या दिवशी आता वाराणसी येथे एका मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे असं होतं आणि आईचं नाव भागीरथी सप्रे-तांबे असं होतं. राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांचं माहेरचं नाव मणिकर्णिका असं होतं. सर्वजण त्यांना लाडाने मनू म्हणायचे.
(हेही वाचा – राजकीय पक्षांनी दिलेले आश्वासन पाळावे, अन्यथा…; Bombay High Court चे निर्देश)
मनूचे आईवडील हे महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गुहागर तालुक्यातल्या तांबे नावाच्या गावातून वाराणसी येथे गेले होते. त्याकाळी वाराणसीचं नाव बनारस असं होतं. मनू पाच वर्षांची असताना तिच्या आईला देवाज्ञा झाली. तिचे वडील कल्याणप्रांतच्या युद्धात सेनापती होते. ते बिठुर जिल्ह्यातल्या पेशवा बाजीराव दुसरे यांच्यासाठी काम करत होते. पेशवे लहानग्या मनूला प्रेमाने “छबिली” म्हणायचे. मनूचं शिक्षण घरीच झालं होतं. तिला लिहायला आणि वाचायला येत होतं. मनू ही तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा जास्त तल्लख होती. तिचे बालपणीचे मित्र नाना साहेब यांच्यासोबत शिक्षक तात्या टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली मनूने रायफल शूटिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि मल्लखांब यांचा अभ्यास केला.
राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांनी पितृसत्ताक भारतीय समाजातल्या महिलांच्या बाबतीत असलेल्या अनेक अयोग्य असलेल्या रूढी-परंपरांचा विरोध केला. राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) या लहानपणापासूनच खूप धाडसी होत्या. त्या राजवड्यातून मंदिरात जाताना बऱ्याचदा पालखी ऐवजी घोड्यावर स्वार होऊन जायच्या. त्यांच्याकडे सारंगी, पवन आणि बादल हे तीन घोडे होते. १८५८ साली किल्ल्यावरून पळून जाताना त्यांनी बादलवर स्वार केली होती. असं इतिहासकारांचं म्हणणं आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांचा महाल आणि राणी महाल यांचं संग्रहालय करण्यात आलं आहे. या संग्रहायलांमध्ये ९व्या ते १२व्या शतकादरम्यानच्या काळातल्या पुरातत्व अवशेषांचा संग्रह ठेवण्यात आलेला आहे. १८५३ साली गंगाधरराव महाराजांचा देहांत झाला त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसी याच्या नेतृत्वाखालच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांचा दत्तक वारसाचा दावा धुडकावून दिला आणि झाशीचा ताबा घेतला.
पण राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांनी झाशीवरचा अधिकार सोडण्यास नकार दिला. राणी लक्ष्मीबाई या (Rani Lakshmibai) १८५८च्या स्वातंत्र्यासमरात सामील झाल्या. त्यांनी आपल्या झाशीच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांविरुद्ध कडवी झुंज दिली. पण १८५८ सालच्या सुरुवातीला ह्यू रोजच्या नेतृत्वाखाली झाशीवर ब्रिटिश सैन्याने ताबा मिळवला.
राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) घोड्यावर बसून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. ग्वाल्हेर काबीज करण्यासाठी त्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये सामील झाल्या. ग्वाल्हेर येथे त्यांनी नाना साहेबांना मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं. त्यानंतर ब्रिटिशांनी ग्वाल्हेरवर आक्रमण केले. ब्रिटिशांच्या विरुद्ध प्राणपणाने लढतांना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे जखमी होऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांना जून १८५८ साली वीरगती प्राप्त झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community