रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

संसदेत १३४ मतं मिळवून निवडणूक जिंकली

185

रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. विक्रमसिंघे हे सध्या श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असून त्यांची खासदारांनी नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात १३४ खासदरांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. श्रीलंकेच्या संसदेत आज, बुधवारी नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी सर्व खासदार उपस्थित होते. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे हेही संसदेत हजर होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी श्रीलंकेच्या संसदेबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

कोण आहेत रानिल विक्रमसिंघे 

  • १९९४ पासून रानिल विक्रमसिंघे हे युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.
  • महिंदा राजपक्षे २०२० मध्ये पंतप्रधान होण्याआधी रानिल हे श्रीलंकेचे पंतप्रधान होते.
  • रनिल यांनी ७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता.
  • १९७७ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते.
  • १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

४४ वर्षांत प्रथमच थेट निवडणुका

श्रीलंकेच्या संसदेत आज ४४ वर्षात प्रथमच थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लास अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, २२५ सदस्यीय सभागृहात मॅजिक फिगर गाठण्यासाठी ११३ जणांचा पाठिंबा आवश्यक होता. यासाठी रानिल विक्रमसिंघे यांना आणखी १६ मतांची गरज होती. विक्रमसिंघे यांना तामिळ पक्षाच्या १२ पैकी किमान ९ मतांचा विश्वास होता. अखेर विक्रमसिंघे यांना १३४ मते मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.