गांधीहत्येत काय होते नेहरुंचे हित? रणजीत सावरकरांचा काँग्रेसला थेट सवाल

103

गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी जवाहरलाल नेहरुंवर मोठा आरोप केला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंवर गांधी हत्येचा आरोप केला आहे. गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी असलेल्या कपूर आयोगाच्या 148 साक्षी खोट्या ठरवत तत्कालीन पंतप्रधान नेहरुंवर आरोप केला. यावरुन गांधी हत्येमागे नेहरुंचे काय हित होते हे तुषार गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट करावे, असं थेट आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या चर्चेत तुषार गांधींनी एका नव्या वादाची भर घातली आहे. गांधी हत्येच्या तपासाच्या संदर्भात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर तपासात ढिलाई असल्याचा आरोप केला. कपूर आयोगाच्या खुल्यासामुळे देशातील हिंदू समाज काँग्रेसच्या विरोधात जाईल अशी भीती नेहरुंना वाटत होती, असे तुषार गांधी म्हणाले. त्यांच्या या आरोपानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी कपूर आयोगाचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, गांधी हत्येच्या तपासात 101 साक्षीदारांचे पुरावे घेतले गेले आणि या प्रकरणानंतरच वीर सावरकरांना सन्मानपूर्वक मुक्त करण्यात आले.

(हेही वाचाः राष्ट्रपिता ही संकल्पनाच अमान्य! रणजीत सावरकरांचा घणाघात )

जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांचा अपमान

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना कुठलेही माफीनामे दिले नाहीत, असे सांगताना रणजीत सावरकर यांनी तुषार गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. याबाबत तुषार गांधींनी त्यांच्याकडे असलेले पुरावे आणावेत मी सुद्धा माझ्याकडे असलेले सर्व पुरावे सादर  तेव्हा जे काही सत्य असेल ते सर्वांसमोर येईल, असे रणजीत सावरकर यावेळी म्हणाले. जालियनवाला बागच्या हत्याकांडात शहीद झालेल्यांबाबत गांधींनी अपमानास्पद विधान केले आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी गांधी सेवाग्रामने प्रकाशित केलेल्या कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी मधील काही संदर्भ सुद्धा सादर केले.

गांधींच्या गोष्टी त्यांच्या वंशजांना खोट्या वाटतात का?

गांधींनी वीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायण सावरकर यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी वीर सावरकरांना ब्रिटिशांना पत्र लिहिण्याचा सल्ला दिला. यानंतर, गांधींनी वीर सावरकरांवर दोन लेखही लिहिले, ज्यात त्यांनी वीर सावरकरांना सर्वात मोठे देशभक्त म्हटले. पण यानंतरही गांधींचे वंशज आणि काँग्रेसचे लोक सावरकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता गांधींनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा आता त्यांचे वंशज आणि काँग्रेसला खोट्या वाटत आहेत का, असा थेट सवालही रणजीत सावरकर यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ)

गांधींनीही पाठवली होती पत्रे

नारायण सावरकर यांना सल्ला देण्याच्या खूप आधी गांधींनी इंग्रजांना राजबंदीवानांना सोडवण्यासाठी पत्रे लिहिली होती. त्यामुळेच पश्चिम बंगालसह देशातील अनेक क्षेत्रातील क्रांतिकारकांना अंदमानातून मुक्त करण्यात आले, असे रणजीत सावरकर यावेळी म्हणाले. पण, वीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांची ब्रिटिशांनी 1921 मध्ये अंदमानातून सुटका केली. यानंतरही वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूंचा तुरुंगातील अत्याचार संपला नाही. बाबाराव सावरकरांना साबरमती कारागृहात ठेवण्यात आले होते, तर वीर सावरकरांना पुण्यातील येरवडा कारागृहात काळ्या पाण्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा देण्यात आल्या. यानंतर वीर सावरकरांना रत्नागिरीत ठेवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.