पीएफआय सारख्या राष्ट्रविघातक शक्तींना काँग्रेसचे समर्थन, वीर सावरकर पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रणजित सावरकरांचा घणाघात

163

कर्नाटकातील धारवाड येथे देशभक्त नागरिक मंच द्वारा आयोजित चक्रवर्ती सुदिनबेले लिखित वीर सावरकर पुस्तक प्रकाशन समारंभ 28 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख श्रीधर, आमदार अरविंद बेलद, अयप्पा देसाई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या रणजित सावरकर यांच्या वतीने धनंजय शिंदे उपस्थित होते.

कोरोना संक्रमित झाल्यामुळे रणजित सावरकर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. सभेला उद्देशून केलेल्या संबोधनात रणजित सावरकर यांनी कर्नाटकशी सावरकरांचा संबंध स्पष्ट करताना सांगितले की पाकिस्तानचे प्रधानमंत्री लियाकत अली यांच्या भारत भेटीला सावरकरांनी विरोध केला, म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांना अटक करून बेळगाव येथील हिंडलगा तुरुंगात ठेवले होते.

सावरकरी विचारांमुळे जिहादी प्रभावहीन

नुकतेच शीमोगा येथे सावरकरांची प्रतिमा लावण्यावरून हिंदू युवकाला भोसकण्यात आले. या जिहादी वृत्तीला आता सहन करता कामा नये. सावरकरांचे विचार आता राष्ट्र विचारी सत्तेत पण लोकप्रिय होऊ लागल्यामुळे सावरकरविरोधी आता हिंसाचार करू लागले आहेत. सावरकरांच्या विचारांमुळे जिहादी विचार प्रभावहीन होत आहेत. खिलाफत चळवळ आणि मोपला येथे झालेल्या हिंसाचारात हिंदूंच्या हत्या, महिलांवर बलात्कार आणि अत्याचार झाले आहेत.

भारतात मुसलमानांची वाढती संख्या

शंभर वर्षांपूर्वी भारतात मुसलमानांची लोकसंख्या 22 टक्के होती. परंतु देश विभाजनानंतर सुद्धा त्यात वाढ होत आहे.
हिंदूंची एकजूट नसल्यामुळे इस्लामी आक्रमणापुढे राजा दाहीरला पराभव पत्करून सिंध प्रांत गमवावा लागला होता. इतिहास विसरलो की भूगोल पण बदलतो. हिंदू विभागला गेला असल्यामुळे हिंदूंनी सावरकरांचे हिंदुत्व आत्मसात करून आता संघटित व्हायला हवे. भारतात उदयास आलेले सर्वच धर्म हिंदू असल्याचे रणजित सावरकर यांच्या वतीन धनंजय शिंदे यांनी भाषणात सांगितले.

New Project 87

धर्म घरात ठेवावा

सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येप्रमाणे जो या भूमीला पुजतो तो हिंदू आणि त्यालाच येथे राहण्याचा अधिकार आहे. हिंदू धर्म अन्य धर्मांना स्वातंत्र्य देतो, त्यामुळे अन्य धर्मांनी धर्मांतरण आणि लव जिहाद सारखे प्रकार करू नयेत. धर्म हे घरात पाळावेत घराबाहेर राष्ट्राचा एक निष्ठावान नागरिक म्हणून रहावे, असेही रणजित सावरकर यांच्या भाषणात म्हटले आहे.

राष्ट्रविघातक शक्तींना काँग्रेसचे समर्थन

भारतातील अल्पसंख्यांकांना अधिक अधिकार न देता सर्वांना समान अधिकार द्यावेत. जेथे-जेथे इस्लामी राज्य स्थापन झाले तेथील अल्पसंख्यांक संपुष्टात आले. मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर होणारे अन्याय आता सहन केले जाणार नाहीत.
भारतातील युवा वर्ग आता सावरकरांचे विचार आत्मसात करू लागला आहे. त्यामुळे जिहादी, कम्युनिस्ट आणि PFI सारख्या राष्ट्र विघातक शक्तींना काँग्रेस समर्थन देत आहे. या शक्ती सावरकरांची केवळ बदनामी करत नसून आता राष्ट्रवादींवर हल्ले करत आहेत. मुस्लिम अधिकारांवर बोलणे म्हणजे सेल्युलर आणि हिंदुत्वावर बोलणे म्हणजे धर्मांधपणा.

आता असे होणार नाही

अशा संकटकाळी कर्नाटकमधील हिंदुत्ववादी संस्था संघटित होत आहेत. राष्ट्रवादाचे तेज प्रज्ज्वलीत होत असल्याचे दिसत आहे. येथील हजारो गणपती मंडळांमध्ये सावरकरांवरील देखावा सादर होत आहे, हा राष्ट्रद्रोहींना एक इशारा आहे. सुधारा अन्यथा आमचे ब्रह्मास्त्र आहे आणि वेळ आली तर ते कसे चालवायचे ते आम्ही चांगलेच जाणतो, असेही रणजित सावरकर यांनी आपल्या भाषणात म्हटल्याचे धनंजय शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.