Ranjit Savarkar : …तेव्हा पाकिस्तानी कमांडरने काढला होता बलात्काराचा फतवा

विभाजनाआधी अत्यंत शिस्तबद्ध असलेली ही सेना पाकिस्तानशी संलग्न झाल्यानंतर मात्र 'जिहादी टेररिस्ट आर्मी'मध्ये परावर्तित झाली.

127
Ranjit Savarkar : ...तेव्हा पाकिस्तानी कमांडरने काढला होता बलात्काराचा फतवा
Ranjit Savarkar : ...तेव्हा पाकिस्तानी कमांडरने काढला होता बलात्काराचा फतवा

१४ ऑगस्ट १९४७ रोजी संयुक्त भारतीय लष्कराची विभागणी करण्यात आली. एक भाग भारतात, तर दुसरा पाकिस्तानात. विभाजनाआधी अत्यंत शिस्तबद्ध असलेली ही सेना पाकिस्तानशी संलग्न झाल्यानंतर मात्र ‘जिहादी टेररिस्ट आर्मी’मध्ये परावर्तित झाली. हे जिहादी स्वरूप इतके भयानक होते की तिथल्या तत्कालीन कमांडरने ‘शिखांच्या कत्तली करा, महिलांवर बलात्कार करा’, असा फतवा काढला होता, अशा कटू आठवणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितल्या. (Ranjit Savarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी ‘सावरकर स्ट्रटेजिक सेंटर’ने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कॅप्टन संजय पराशर, कॅप्टन सिकंदर रिझवी हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आदी उपस्थित होते. (Ranjit Savarkar)

रणजित सावरकर म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचे नाव ‘पाकिस्तान रेप ऑफ काश्मीर’, असे जाणीवपूर्वक ठेवले आहे. कारण त्याला काळ्या इतिहासाची किनार आहे. आजच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर १९४७ च्या पहाटे सारे भारतीय नागरिक निद्रेत असताना पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर या जिहाद्यांनी काश्मीरची जी हालत केली, त्याची धग आज ७६ वर्षांनंतरही जाणवत आहे. त्यामुळे या काळ्या आठवणी कालागत होऊ न देता, प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या ठासवल्या पाहिजेत. जेणेकरून पाकड्यांच्या या क्रौरकृत्याला जशासतसे उत्तर देण्याची भावना तरुणांमध्ये तीव्र होत राहील. (Ranjit Savarkar)

(हेही वाचा – Jawaharlal Nehru : पंतप्रधान नेहरूंनी सैन्यदलांचे खच्चीकरण केले; ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी उघड केले जळजळीत वास्तव)

जिहादी टेररिस्ट आर्मी
  • १४ ऑगस्ट १९४७ मध्ये संयुक्त भारतीय लष्कराची विभागणी झाली. त्यावेळी लष्करात सर्वाधिक जवान हे मुस्लिम असल्यामुळे एक मोठा भाग पाकिस्तानला देण्यात आला आणि उर्वरित भाग भारताकडे राहिला. एकत्र असताना देशातील ही अत्यंत शिस्तबद्ध सेना होती. मात्र, पाकिस्तान स्वतंत्र देश घोषित झाल्यानंतर विभाजित झालेल्या पाक लष्कराने ‘जिहादी टेररिस्ट आर्मी’चे स्वरूप धारण केले. (Ranjit Savarkar)
  • तत्कालीन पाकिस्तानी कमांडरने पाठवलेला टेलिग्राम हे त्याचे भयंकर उदाहरण आहे. ‘शॉट ऑल शीख. रेप ऑल विमेन’, अशी दोन वाक्ये त्यात लिहिली होती. यावरून त्यांची मानसिकता काय होती, याचा अंदाज लावता येईल. या मानसिकतेत ७६ वर्षांत काडीचाही बदल झालेला नाही. उलट जिहादचे स्वरूप अधिकाधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे यांना जशासतसे उत्तर दिले नाही, तर येणारा काळ कठीण असेल, असेही रणजित सावरकर म्हणाले. (Ranjit Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.