माझ्या ‘त्या’ फोटोसोबत छेडछाड, Nude Photoshoot बाबत रणवीरचा मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट चांगलेच व्हायरल झाल्याने तो खूप चर्चेत होता. यासह त्याच्यावर बऱ्याच टीका देखील करण्यात आल्या होत्या. परंतु आता रणवीरने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात मोठा खुलासा केला आहे. यामध्ये तो असे म्हणाला की, त्याच्या फोटोसह छेडछाड करण्यात आली आहे. रणवीरने केलेला हा दावा खरा ठरल्यास त्याच्यावर झालेले सर्व गुन्हे खोटे ठरत त्याला क्लिन चीट मिळू शकते.

(हेही वाचा – BCCI बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! सौरव गांगुलीसह जय शाह पदावर राहणार कायम)

 रणवीर सिंहने केला मोठा खुलासा

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहविरोधात मुंबई पोलिसांनी २६ जुलै २०२२ रोजी एफआयआर दाखल केली होती. मात्र व्हायरल होत असलेले न्यूड फोटो रणवीरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपलोड झाले नसल्याचेही त्याने आता म्हटले आहे. याबाबत २९ ऑगस्टला मुंबई पोलिसांत जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये तो असे म्हणाला की, व्हायरल होत असलेले माझे काही फोटो मी अपलोड केलेले नाही. कारण मी माझ्या इन्टाग्रामवर अपलोड केलेल्या सात फोटोंपैकी तो फोटो नाही, ज्यामध्ये गुप्तांगाचा भाग दिसतोय. कोणीतरी माझ्या फोटोसोबत छेडछाड केलेली आहे. या फोटो संदर्भात केलेल्या नव्या खुलासाने आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून पोलिसांना वेगळ्या दिशेने आपला तपास करावा लागणार असल्याचे दिसतेय.

पोलिसांनी आता हा फोटो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला असून त्यामध्ये छेडछाड झाली आहे की नाही याची माहिती समोर येणार आहे. जर फोटोसोबत छेडछाड केली असेल तर रणवीरला क्लिन चीट मिळण्याची शक्यता आहे. जर तसे नसेल तर रणवीरच्या अडचणीमध्ये वाढ होणार हे नक्की आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here