त्याने तिला हॉटेलवर बोलावले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर…

तिचा वाढदिवस साजरा करता आला नसल्यामुळे, त्याने सोमवारी वरळीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बूक केली होती.

टिंडर अॅपवर ओळख झालेल्या तरुणीला एका पंचारातकित हॉटेलात पार्टीसाठी बोलावून, तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार वरळी येथे घडला आहे. तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार झाला. बलात्कारी पुरुष हा एका स्नॅक्स बनवणाऱ्या बड्या नामांकित कंपनीच्या संचालक मंडळावर असल्याचे कळते. वरळी पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले

विनीत अग्रवाल असे या संशयिताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी अवीन अग्रवाल आणि पीडित तरुणीची टिंडर अॅप वर ओळख झाली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या तरुणीचा वाढदिवस होता. मात्र काही कारणास्तव अवीन अग्रवालला तिचा वाढदिवस साजरा करता आला नसल्यामुळे, त्याने सोमवारी वरळीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बूक केली होती. पीडित तरुणीला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने हॉटेलवर बोलावून घेतले.

ड्रिंकमधून पाजले गुंगीचे औषध

त्यानंतर त्याने खोलीत एका चॉकलेट केकची ऑर्डर दिली. मात्र, मला चॉकलेट केक आवडत नसल्याचे पीडित तरुणीने सांगताच त्याने वेगळ्या फ्लेवरच्या केकची ऑर्डर दिली. त्यानंतर दोघांनी ड्रिंक घेतले. पण ड्रिंक घेतल्यावर पीडित तरुणीला अस्वस्थ वाटू लागले आणि तिला गुंगी आली. गुंगी उतरल्यावर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. त्याचवेळी हॉटेलच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी बाहेरुन ठोठावला. तेव्हा अवीन अग्रवाल प्रथम दार उघडत नव्हता, मात्र पीडितेने त्याला दार उघडायला लावले. दार उघडताच खोलीत आणखी एक तरुणी आली आणि ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचे दोघांच्या बोलण्यावरुन, पीडित तरुणीच्या लक्षात आले.

आरोपी फरार

पीडित तरुणी हा प्रकार वर्सोवा येथील आपल्या खोलीवरील मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिला पोलिसात तक्रार देण्यास सांगितले असता, पीडितेने पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर फोन केला. वर्सोवा पोलिसांनी पीडितेची तक्रार लिहून अवीन अग्रवाल याच्याविरुद्ध बलात्कार आणि गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी गुन्हा वरळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नसून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here