Rashmi Shukla: फोन टॅपिंग प्रकरण; तत्कालीन पोलीस उपायुक्तांचा धक्कादायक खुलासा

156

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान रश्मी शुल्का यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावले. त्यामुळे आता रश्मी शुल्का यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

‘या’ नेत्यांनी केले होते आरोप

2021 मध्ये हा मुद्दा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन रश्मी शुक्ला यांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. या फोन टॅपिंग प्रकरणात भाजपचे बडे नेते, राष्ट्रवादीचे काही नेते आणि काॅंग्रेसचे नाना पटोल यांनी नावे आहेत.

फोन टॅप केल्याचा आरोप असलेल्यांमध्ये नाना पटोले, रावसाहेब दानवे यांचे पीए, भाजप खासदार संजय काकडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचे फोन टॅपिंगचे आरोप आहेत.

( हेही वाचा: भारतीयांच्या हाताला भारी चव; सर्वोत्कृष्ठ खाद्यपदार्थ तयार करणा-या देशांत भारत ‘टाॅप फाईव्ह’मध्ये )

पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालायने फेटाळला

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे प्रमुख होते. समितीच्या तपासानंतर पुण्याच्या पोलीस निरिक्षक वैशाली चांदगुडे यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु जुलै 2022 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. त्यानंतर पुणे न्यायालयात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळल्याने, आता शुल्का यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.