राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना CBI ने समन्स बजावले आहे. या समन्सच्या माध्यमातून तेजस्वी यादव यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना जमिनीच्या बदली नोकरी देण्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत.
यापूर्वी 4 फेब्रुवारीला तेजस्वी यादव यांना याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यावेळी ते उपस्थित राहिले नव्हते, म्हणून आता सीबीआयने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सीबीआयने लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची चौकशी केली होती. आता सीबीआयने आपला मोर्चा लालू प्रसाद यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे वळवला आहे.
CBI has summoned Bihar Deputy CM and RJD leader Tejashwi Yadav today, March 11 in connection with land-for-job case. This is the second summon issued to him, the first being issued on 4th February: Agency official
(File photo) pic.twitter.com/8s564sDzu2
— ANI (@ANI) March 11, 2023
( हेही वाचा: आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना )
चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
यापूर्वी, जमीन- नोकरीच्या घोटाळ्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यासोबतच ईडीने तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स काॅलनी येथील घरावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या छाप्याच्या एका दिवसानंतर सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
Join Our WhatsApp Community