ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) आपल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यासंबंधीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रतन टाटांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने नुकतच गौरवण्यात आले आहे. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. फॅरेल यांनी ट्विटरवर टाटा यांच्यासमवेत काही छायाचित्र जारी केली आहेत.
रतन टाटांच्या (Ratan Tata) कर्तुत्वाचा प्रभाव ऑस्ट्रेलियावर पडला
रतन टाटा हे केवळ भारतातील व्यापार उद्योग आणि दानशूरतेचे प्रतीक नसून त्यांच्या कर्तुत्वाचा प्रभाव ऑस्ट्रेलियावरही पडला आहे. असे यावेळी फॅरेल यांनी नमूद केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारने रतन टाटा (Ratan Tata) यांचा गौरव करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असेही फॅरेल यांनी स्पष्ट केले. टाटांना सन्मान प्रदान करताना त्यांच्या समवेत टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरनही उपस्थित होते.
Ratan Tata is a titan of biz, industry & philanthropy not just in 🇮🇳, but his contributions have also made a significant impact in 🇦🇺. Delighted to confer Order of Australia (AO) honour to @RNTata2000 in recognition of his longstanding commitment to the 🇦🇺🇮🇳relationship. @ausgov pic.twitter.com/N7e05sWzpV
— Barry O’Farrell AO (@AusHCIndia) April 22, 2023
(हेही वाचा – World Malaria Day : मलेरिया डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘इको बायो ट्रॅप’`चा पायलट प्रोजेक्ट)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांवर रतन टाटा (Ratan Tata) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव असून हे संबंध वृद्धगिंत करण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले आहेत. दोन्ही देशांसाठी त्यांनी दिलेले योगदान पाहता त्यांचा सन्मान करण्यात येत आहे, असे फॅरेल यांनी ट्विटमध्ये नमूद केले.
(हेही वाचा – BARC : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022 – 23 चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न)
दरम्यान रतन टाटा (Ratan Tata) यांच्या सन्मानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक नेटकऱ्यांनी भारतरत्न या सर्वोच्च सन्माने त्यांचा गौरव करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी ‘यांचा’ सन्मान
यापूर्वी हा सन्मान दिवंगत मदर तेरेसा (१९८२) माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबाजी (२००६) क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (२०१२) व बायकॉनच्या किरण मुजुमदार- शॉ (२०२०) यांना प्रदान करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community