रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. ते टाटा समूहाचे प्रमुख होते. त्यांनी टाटा समुहाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण रतन टाटा यांना लोक केवळ उद्योजक म्हणून ओळखत नाहीत तर चांगला माणूस आणि समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोणाला वाटणार नाही की रतन टाटा यांच्याएवढे आपणही श्रीमंत व्हावे? पण मित्रांनो, रतन टाटा केवळ पैशाने श्रीमंत नव्हते तर ते मनाने सुद्धा श्रीमंत होते. (Ratan Tata Birthday Wishes)
(हेही वाचा- लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले)
आपल्याला माहितीच आहे की रतन टाटा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१८ मध्ये रतन टाता यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते बकिंघम पॅलेस येथे पुरस्कार मिळणार होता. पिन्स चार्ल्सने टाटा यांच्या स्वागताची जैय्यत तयारी केली. पण ऐन वेळी रतन टाटा यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की “मी पुरस्कार स्वीकारायला येऊ शकत नाही.” सर्वांना आश्चर्य वाटलं की रतन टाटा असे वागणार नाही. काहीतरी मोठं कारण असेल. कदाचित त्यांची तब्येत बिघडली असेल. पण जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना खरं कारण कळलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. रतन टाटा पुरस्कार स्वीकारायला गेले नाहीत, कारण त्यांच्या पाळीव कुत्र्याची तब्येत खराब होती. हे कारण ऐकल्यावर प्रिन्सचे टाटा यांची खूप स्तुती केली आणि म्हणाले की रतन टाटा एक महान व्यक्ती आहेत. (Ratan Tata Birthday Wishes)
चला तर महान उद्योगपती रतन टाटा यांचे Marathi quotes पाहुयात:-
१. जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चाला. परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चाला.
२. आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ? परंतु प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे.
३. पैसे तुमचे आहेत पण संसाधने समाजाचे आहेत.
४. सर्वांमध्ये समान योग्यता नाही, हे खरं आहे. पण आपली प्रतिभा विकसित करण्यासाठी सगळ्यांना समान संधी मिळते.
५. मी भारताचे भविष्य आणि त्याची क्षमता यांबाबत आश्वस्त आहे. आपला देश खूप महान आहे. आपल्या देशात खूप क्षमता आहे.
६. “योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे.”
७. “आपल्याला जे काम करायला आवडते ते काम आपण केले पाहिजे. पण ते काम वेळेवर केले पाहिजे.”
८. आपण सर्व जण मनुष्य आहोत, संगणक नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. दुःख करत बसू नका.
९. तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितके निष्पक्ष राहा.
१०. तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.
११. ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांनी त्यांचा फायदा पाहू नये. तर समाजाचा फायदा होईल असं पाहावं.
१२. कधीही पैशांचा पाठलाग करू नका, कामावर लक्ष केंद्रित करा. पैसा आपोआप येईल.
१३. इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती थोड्या काळासाठी यश मिळवू शकते. परंतु ती आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही.
१४. सर्वात मोठे अपयश; प्रयत्न न करणे हे आहे.
१५. आयुष्यातील चढ-उतार खूप महत्त्वाचे आहेत. कारण ईसीजीमध्ये चढ-उतार नसतील – तर आपल्याला मृत घोषित केले जाते. आयुष्याचेही तसेच आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community