Ration Card: १५ कोटी रेशन धारकांना होणार ‘या’ नव्या नियमाचा फायदा

119

तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रेशन कार्ड धारकांसाठी आता शासन नवा नियम लागू करणार असल्याचे सांगितले जात आहे. या नियमाचा लाभ तब्बल १५ कोटी रेशन कार्ड धारकांना होणार आहे. उत्तर प्रदेश सरकार सावर्जनिक रेशन व्यवस्थेत मोठा बदल करत आहे. या बदलानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानांतून चांगले पौष्टिक तांदूळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून रेशन कार्ड धारकांसाठी वेळोवेळी योग्य ती पावले उचलली जात असतात. रेशन दुकानांमध्ये मिळणारे तांदूळ पौष्टिक असणार असून १५ कोटी लोकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा- रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर)

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत उत्तरप्रदेशमध्ये सुमारे ८० हजार रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून ३.५९ कोटी शिधापत्रिका धारकांपर्यंत पौष्टिक तांदूळ पोहोचणार असून कुपोषण थांबवण्याच्या दिशेने शासनाने मोठं पाऊल उचलले आहे. असेही सांगितले जात आहे की, २०२३ पासून हे तांदूळ प्रत्येक दुकानात उपलब्ध होणार आहे. उत्तर प्रदेशात मध्यान्ह भोजन योजना आणि एकात्मिक बाल विकास योजनेसाठी सप्टेंबर २०२१ पासून पौष्टिक तांदूळ वाटप केले जाणार आहे. जून महिन्यापासून राज्यातील ३१ जिल्हयात शिधा वाटप दुकानात फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – आता घरबसल्या मिळणार रेशन कार्ड, केंद्र सरकारची नवी सुविधा)

काय आहे पौष्टिक तांदुळाचे फायदे

यावर्षी साधारण ४७ लाख टन तांदूळ सरकारकडे राहाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशातील काही भागातील महिला अशक्तपणाने त्रस्त आहेत. कुपोषण थांबवण्यासाठी हे पोषणयुक्त तांदूळ महत्वाचे ठरतात. नियमानुसार, एक किलो फोर्टिफाइड तांदळात २८ ते ४२.५ मिलीग्राम लोह, ७५ ते १२५ मायक्रोग्रॅम फॉलिक अ‍ॅसिड आणि ०.७५ ते १.२५ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी-१२ असते. फोर्टिफाइड तांदूळ महिलांमधील अ‍ॅनिमिया तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.