PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

137

जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल आणि तुम्ही केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे (PMGKAY) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 28 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरिबांसाठीच्या अन्न योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ही योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली असून या योजनेशी संबंधित मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – पुन्हा होणार नोटबंदी! भाजप खासदाराने का केली २ हजारांची नोट बंद करण्याची मागणी?)

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आली आहे. सरकार मोफत रेशन योजनेला पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून सध्या 15 डिसेंबर या कालावधीत चालू महिन्याचे शिधावाटप केले जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत, देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो धान्य मोफत दिले जाते. लॉकडाऊनच्या काळात सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली होती. एप्रिल 2020 मध्ये सुरू झालेली ही योजना मार्च 2022 मध्ये सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात असून ती तीन महिन्यांसाठी डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा विचार केला जात आहे.

अन्न योजना 2024 पर्यंत सुरू राहणार!

ही योजना मोदी सरकार 2024 पर्यंत सुरू ठेवणार असून सरकारकडून या योजनेत पुन्हा एकदा वाढ करण्याचा विचार केला तर 80 कोटी लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत या योजनेवर सरकारने 3.50 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.