Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा! डिसेंबरपासून मिळणार…

151

आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि संबंधित राज्य सरकार शिधापत्रिकाधारकांना नेहमीच नव्या योजना आणि सुविधा पुरवत असतात. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी शासनाकडून वेळोवेळी नवनवीन घोषणा केल्या जातात. धान्य वाटपाव्यतिरिक्त, सरकारकडून प्रत्येक शिधापत्रिकाधारकासाठी आयुष्मान कार्ड देखील बनवले जात आहे. जेणेकरून त्यांना मोफत उपचारही मिळू शकतील.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार हा लाभ

आता हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे एक हजार क्विंटल पिठाचा खप वाढणार आहे.

डिसेंबरपासून मिळणार 13 किलो पीठ

अन्न, नागरी आणि ग्राहक व्यवहार विभागाकडून डिसेंबर महिन्याकरता राज्यासाठी रेशनचे वाटप जारी करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकेवर लाभार्थ्यांना 12.5 किलो पीठ देण्यात आले. आता नव्या योजनेत डिसेंबरमध्ये 13 किलो पीठ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांना अनुदानित रेशनमध्ये तीन प्रकारच्या डाळी, 2 लिटर तेल, 500 ग्रॅम साखर आणि प्रति व्यक्ती एक किलो मीठ देण्यात येते.

(हेही वाचा – १ डिसेंबरपासून तुमच्याकडे Digital Currency येणार! कसा करता येणार वापर?)

राज्य शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना साखर, तेल व कडधान्ये आदींचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारकडून पीठ आणि तांदूळ दिले जात आहे. राज्य सरकारच्या वतीने खातेदारांना महिन्याच्या पहिल्या तारखेला (1 डिसेंबर) गोदामातून रेशन उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिमाचलमध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.