Ratna Pathak : ‘मिडल क्लास’ म्हणत लोकांना खळखळून हसवणारी ‘ही’ अभिनेत्री तुम्हाला आठवते का ?

246
Ratna Pathak : 'मिडल क्लास’ म्हणत लोकांना खळखळून हसवणारी 'ही' अभिनेत्री तुम्हाला आठवते का ?
Ratna Pathak : 'मिडल क्लास’ म्हणत लोकांना खळखळून हसवणारी 'ही' अभिनेत्री तुम्हाला आठवते का ?

साराभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका खूप गाजली. त्यातील सगळेच पात्र लोकांच्या आजही लक्षात आहेत. मात्र रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी मोनिशाला ’मिडल क्लास’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. रत्ना पाठक (Ratna Pathak) ह्या अभिनेते नासिरुद्दिन शाह यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म एका गुजराती हिंदू कुटुंबात १८ मार्च १९५७ रोजी मुंबईत झाला.

(हेही वाचा – Shashi Kapoor: “मेरे पास मां हैं” हा ‘या’ अभिनेत्याचा डायलॉग आजही प्रसिद्ध, वाचा सविस्तर…)

माया साराभाई भूमिका लोकप्रिय

मिर्च मसाला या त्यांना चित्रपट खूप गाजला. त्याचबरोबर अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांची साराभाई व्हर्सेस साराभाईमधील (Sarabhai vs Sarabhai) माया साराभाई ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली. उच्चभ्रू समाजातील महिला कशा असतात, याचं एक व्यंगात्मक चित्र त्यांनी उभं केलं. यासाठी त्यांना २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयटीए पुरस्कार (ITA Award) मिळाला.

सक्षम भूमिकांसाठी प्रसिद्ध

रत्ना पाठक शाह या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहेत. विविध हिंदी नाटके, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये त्यांनी सक्षम भूमिका निभावल्या आहेत. आज स्टार झाल्यानंतरही त्यांनी रंगभूमीशी नाते तोडले नाही. हिंदीसह इंग्रजी नाटकांमध्येही त्यांनी काम केले आहे. १९८० च्या दशकात टीव्ही मालिका ’इधर उधर’ मध्ये त्यांनी काम केले आणि त्यांना या मालिकेतून पुष्कळ प्रसिद्धी मिळाली.

त्यांनी अनेक रशियन नाटकांमध्ये देखील काम केले आहे, तसेच “मोटली थिएटर ग्रुप” (Motley Theater Group) च्या त्या सह-संस्थापक आहेत. त्यांनी गोलमाल ३ सारख्या अनेक व्यावसायिक चित्राटांत काम केले आहे. त्यांनी गुजराती चित्रपट “कच्छ एक्सप्रेस गुजराती मूव्ही” मध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. हा त्यांचा पहिला गुजरती चित्रपट आहे. विशेष म्हणजे २०१२ च्या पद्मश्री आणि पद्मभूषण निवड समितीच्या त्या सदस्य होत्या. (Ratna Pathak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.