Mumbai Metro One: मुंबईची मेट्रो वन चालवणार रत्नागिरीची कन्या

अनुया करंबेळकरची लोको पायलट म्हणून नियुक्ती

112

जागतिक स्तरावर स्पर्धा करणाऱ्या मुंबईच्या पहिल्या मेट्रो वनच्या लोको पायलटपदी रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावाची कन्या अनुया दिलीप करंबेळकर हिची नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्या या यशाने नाचणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

वडिलांच्या व्यवसायात मुलीली रूची

रत्नागिरीच्या ग्रामीण भागातील एक मुलगी आता मुंबईची मेट्रो चालवणार असल्याने संपूर्ण तालुक्यातून अनुयाचे अभिनंदन करण्यात येत आहे. नाचणे गावात अनुयाचे वडील दिलीप करंबेळकर यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. मुलीला व्यवसायात रुची असल्यामुळे त्यांनी तिला व्यवसायाची माहिती दिली होती. याच आवडीमुळे अनुयाने शिर्के हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एम. सी. व्ही. सी. (इलेक्ट्रॉनिक्स) मधून शिक्षण पूर्ण केले.

(हेही वाचा – एलॉन मस्क तयार करणार स्मार्टफोन! Apple आणि Google ला दिला थेट इशारा, म्हणाले…)

त्यानंतर तिने मुंबईतील विवेकानंद महाविद्यालयातून इंस्ट्रुमेंशनचा डिप्लोमा पूर्ण केला. हे शिक्षण घेत असतानाच तिला मुंबई मेट्रोचा संदर्भ मिळाला. पुढे तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले. या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया करंबेळकरची मुंबई मेट्रोची लोको पायलट म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुंबई मेट्रो वनचे अनुयाला पत्र

आमच्या मुंबई मेट्रो वन फॅमिलीचा एक भाग म्हणून आम्हाला आनंद होत आहे. तुमची आमच्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी निवड केली गेली आहे. तुमच्याकडील गुण आणि क्षमतेमुळे जे पुढे मुंबई मेट्रो वनच्या यशोगाथेला हातभार लावतील. आमच्या मुंबई मेट्रो परिवारामध्ये आम्ही तुमचे पुन्हा एकदा स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे, असे पत्र अनुया करंबेळकरला मुंबई मेट्रो वनने पाठवले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.