रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडकी झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या धडकेत दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केले आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.
गुहागर तालुक्यात सोमवारी सकाळी हा अपघात झाला. धोपावे- चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस विरुद्ध दिशेने येत होत्या. परंतु एका अवघड वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही चालकांचे बसवरीवल नियंत्रण सुटले आणि बस एकमेकांवर आदळल्या. अपघात एवढा भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, ज्यात दोन्ही बसमधील चालकांना गंभीर दुखापत झाली. तर दोन्ही बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दोन्ही बसच्या चालकांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरु करण्यात आले.
( हेही वाचा: NIA ॲक्शन मोडमध्ये! देशातील 60 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी )
कोकणात पाऊस सुरुच
रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. तर तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
Join Our WhatsApp Community