भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड

अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. रवी चौधरी असे त्यांचे नाव असून अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील संरक्षण उपमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ म्हणून यापूर्वी रवी चौधरी यांनी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांची जबाबदारी सांभाळली आहे. रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

चौधरी हे 1993 ते 2015 या काळात एअरफोर्सचे अॅक्टिव्ह मेंबर होते. या कालावधीत त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा दोन डिव्हीजनचे नेतृत्व केले आहे. सी- 17 चे ते पायलटदेखील होते.

( हेही वाचा: अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; दोघांविरोधात गुन्हा दाखल )

ओबामांच्या काळात बजावलीय महत्त्वाची कामगिरी 

तसेच, अफगाणिस्तान आणि इराक युद्धातील अनेक ऑपरेशन्समध्ये ते सहभागी होते. इराकमध्ये बरेच दिवस ते कार्यरत होते. चौधरी एविएशन इंजिनिअरदेखील आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाला लेटेस्ट टेक्नाॅलाॅजी देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात रवि चौधरी हे प्रेसिडेंट अॅडव्हायजरी कमिशनचे सदस्य होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here