Ravi Shankar Vyas : डाकूंना मूळ प्रवाहात आणण्यासाठी झटणारे रविशंकर व्यास

अहमदाबादमधील जातीय हिंसाचार शांत करण्याचा त्यांनी काटेकोर प्रयत्न केला. भूदान चळवळीत ते विनोबा भावे यांच्यासोबत सामील झाले आणि १९५५ ते १९५८ दरम्यान त्यांनी ६००० किलोमीटर एवढा प्रवास केला.

192
Ravi Shankar Vyas : डाकूंना मूळ प्रवाहात आणण्यासाठी झटणारे रविशंकर व्यास

भारत सरकारने १९८४ मध्ये रविशंकर व्यास (Ravi Shankar Vyas) यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले होते. गुजरात सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या सन्मानार्थ १ लाख रुपयांचा सामाजिक कार्यासाठीचा रविशंकर महाराज पुरस्कार निर्माण केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारने ज्यांची दखल घेतली ते रविशंकर महाराज आहेत तरी कोण? चला तर आपण त्यांचा जीवन परिचय पाहुया… (Ravi Shankar Vyas)

रविशंकर व्यास (Ravi Shankar Vyas) यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८८४ रोजी त्यांच्या आईच्या राधू या गावात हिंदू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब महेमदावाद जवळील सरसावनी गावातले होते. व्यास यांचे शिक्षण फारसे झाले नाही. आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी त्यांनी सहावीनंतर शिक्षण सोडले. ते १९ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि ते २२ वर्षांचे असताना त्यांची आई देखील देवाघरी गेली. सूरजबा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्यावर आर्य समाजाचा प्रभाव होता. (Ravi Shankar Vyas)

(हेही वाचा – Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई लोकलने केला प्रवास, प्रवाशांसोबत काढले सेल्फी आणि साधला संवाद )

…म्हणून लोक त्यांना रविशंकर महाराज संबोधू लागले

१९१५ मध्ये ते गांधींना भेटले. त्यांच्याकडून प्रेरित होऊन ते त्यांच्या स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक सुधारणांच्या कार्यात सहभागी झाले. मध्य गुजरातमधील बरैया आणि पाटणवाडिया जमातींच्या पुनर्वसनासाठी ते वर्षानुवर्षे झटत होते. त्यांनी (Ravi Shankar Vyas) १९२० मध्ये सुनव गावात राष्ट्रीय शाळा स्थापन केली. १९२७ मध्ये पूरग्रस्तांच्या मदतकार्यात भाग घेतला. त्याचबरोबर १०३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहात आणि १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनातही भाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. (Ravi Shankar Vyas)

अहमदाबादमधील जातीय हिंसाचार शांत करण्याचा त्यांनी (Ravi Shankar Vyas) काटेकोर प्रयत्न केला. भूदान चळवळीत ते विनोबा भावे यांच्यासोबत सामील झाले आणि १९५५ ते १९५८ दरम्यान त्यांनी ६००० किलोमीटर एवढा प्रवास केला. तसेच वात्रक नदीच्या आजूबाजूच्या गावातील लोकांचे जीवनमान सुधारणे, दरोडेखोरांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी कामे त्यांनी केली. त्यांना लोक रविशंकर महाराज म्हणून संबोधू लागले. १ जुलै १९८४ रोजी गुजरातमधील बोरसद येथे त्यांचे निधन झाले. (Ravi Shankar Vyas)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.