सामाजिक आणि मानव-समस्यांवर लिखाण करणारे हिंदी साहित्यिक Ravindra Prabhat

129

रवींद्र प्रभात हे एक भारतीय असून हिंदी भाषेतील कादंबरीकार, कवी, पत्रकार आणि लघुकथा लेखक आहेत. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९६९ साली सीतामढी जवळच्या महिंदवाडा नावाच्या गावात झाला. त्यांचं बालपण त्यांच्या याच गावात गेलं. तसंच रवींद्र प्रभात (Ravindra Prabhat) यांनी आपलं प्राथमिक शिक्षणही महिंदवाडा या गावातच घेतलं.

त्यानंतर त्यांनी मुजफ्फरपूर येथील बी.आर. आंबेडकर विश्वविद्यालयातून भूगोल विषयात उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर रवींद्र प्रभात (Ravindra Prabhat) यांनी अलाहाबाद येथील उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठातून मास्टर्स ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयात आपलं शिक्षण पूर्ण केलं.

(हेही वाचा Jammu Kashmir Infiltration: उरीमध्ये घुसखोरीचा डाव सुरक्षा जवानांनी उधळला, एक दहशतवादी ठार)

रवींद्र प्रभात यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रथेनुसार वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्यावर उपनयन संस्कार करण्यात आले. १९८७ सालापासून रवींद्र प्रभात हे वेगवेगळ्या विषयांवर लिहीत आले आहेत. त्यांच्या अनेक कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करून मासिके आणि साप्ताहिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सध्या रवींद्र प्रभात (Ravindra Prabhat) हे वटवृक्ष आणि परिकल्पना समय नावाच्या हिंदी मासिकांचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

रवींद्र प्रभात (Ravindra Prabhat) हे नेहमी सामाजिक आणि मानव-समस्या या विषयांवर आपलं लिखाण करत असतात. २००७ साली त्यांनी आपला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तसेच त्यांनी आपले इतर लेखही ब्लॉगवर प्रकाशित केले आहेत. भारतात ब्लॉगर्सना परिकल्पना पुरस्कार नावाचा ब्लॉग साहित्यिक पुरस्कार देण्यात येतो. रवींद्र प्रभात हे त्या पुरस्काराचे संस्थापक सदस्यही आहेत. पहिला परिकल्पना पुरस्कार हा २०११ साली देण्यात आला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.