RBIच्या मंजुरीनंतर ‘या’ बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट!

108

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Unified payments interface (UPI) प्लॅटफॉर्मशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी केलेल्या या घोषणेमुळे क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट करता येण शक्य होणार आहे. सुरूवातीला रूपे क्रेडिट कार्डलाच ही सुविधा देण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. यूपीआय ग्राहकांना सध्या फक्त डेबिट कार्ड आणि सेव्हिंग तथा करंट अकाऊंटवरच वित्तीय व्यवहार करण्याची सुविधा मिळत आहे. क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश देण्यात येणार आहेत. सध्या कोणत्या बँका रुपे क्रेडिट कार्ड देत आहेत, ते जाणून घेऊया…

(हेही वाचा – Monkeypox Virus: मंकीपॉक्सविरुद्ध ‘WHO’ ने सुचविलेले हे ५ उपाय)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्वात पहिल्यांदा रुपे क्रेडिट कार्ड देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर रुपे क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव पहिल्यांदा घेण्यात येते. स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या ‘शौर्य एसबीआय रुपे कार्ड’ आणि ‘शौर्य सिलेक्ट एसबीआय रुपे कार्ड’ ऑफर करत आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँकदेखील स्टेट बँक ऑफ इंडियाप्रमाणे दोन रुपे क्रेडिट कार्ड ग्राहकांना ऑफर करत आहे. ‘पीएनबी रूपे सिलेक्ट कार्ड आणि पीएनबी प्लॅटिनम रुपे कार्ड अशी कार्ड या बँकेकडून देण्यात येत आहे.

बँक ऑफ बडोदा (BoB)

या सरकारी बँकेच्या पोर्टफोलिओमध्ये बँक ऑफ बडोदा इझी रुपे क्रेडिट कार्ड आणि बँक ऑफ बडोदा प्रीमियर रुपे क्रेडिट कार्ड अशी दोन रूपे क्रेडिट कार्ड देखील आहेत.

आयडीबीआय बँक (IDBI)

आयडीबीआय बँक ही बँक विनिंग्स रुपे सिलेक्ट कार्ड ग्राहकांना ऑफर करते.

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India)

युनियन बँक ऑफ इंडिया ही बँक युनियन प्लॅटिनम रुपे कार्ड आणि युनियन सिलेक्ट रुपे कार्ड ऑफर करते.

सारस्वत बँक (Saraswat Bank)

सारस्वत बँक ग्राहकांना सारस्वत बँकेचे प्लॅटिनम रुपे कार्ड देते.

फेडरल बँक (Federal Bank)

फेडरल बँक रुपे सिग्नेट क्रेडिट कार्ड ग्राहकांना ऑफर करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.