RBI Announcement: क्रेडिट कार्ड UPI ला जोडण्याचा प्रस्ताव; हे आहेत फायदे

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक धोरणाच्या बैठकीचे निकाल जाहीर केले. रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. यासोबतच दास यांनी Credit Card आणि सहकारी बॅंकांबाबतही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

RBI ने Unified payments interface (UPI) प्लॅटफाॅर्मशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. गव्हर्नर दास म्हणाले की सुरुवातीला Rupay Credit Card UPI प्लॅटफाॅर्मशी जोडले जाईल, ते वापरकर्त्यांना अतिरिक्त सुविधा देईल आणि डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढेल. सध्या UPI वापरकर्त्यांच्या डेबिट कार्डद्वारे बचत किंवा चालू खाती लिंक करुन व्यवहार सुलभ करते.

( हेही वाचा :विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; या नव्या चेह-यांना संधी, तर पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा डावलले )

सहाकारी बॅंका देऊ शकणार अधिक कर्ज

गृहनिर्माण क्षेत्राला पतपुरवठा वाढवण्यासाठी, RBI ने बुधवारी सहकारी बॅकांसाठी घोषणा केल्या. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना सांगितले की, सहकारी बॅंका आता गृहकर्जासाठी अधिक कर्ज देऊ शकतील. निवासाच्या वाढत्या किंमती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे दास यांनी सांगितले. घरांच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी आणि ग्रामीण सहकारी बॅकांद्वारे दिलेल्या वैयक्तिक गृहकर्जाच्या मर्यादेत 100 टक्क्यांहून अधिक सुधारणा करण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here