‘सांगा अदानीला किती कर्ज दिले?’; RBIचे बँकांना आदेश

133

RBI on Adani Group Case: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि LIC शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, अदानीचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. तर SBI, बॅंक ऑफ बडोदा, PNB सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आरबीआयनेही याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बॅंक नियामक आरबीआयने अदानी प्रकरणात सर्व बॅंकांकडून अहवाल मागवला आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांना किती कर्ज दिले आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा आरबीआयचे सर्व बॅंकांना केली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची माहिती रिझर्व्ह बॅंकेने मागवून घेतली आहे.

( हेही वाचा: लोकशाहीवर दमदार भाषण देणाऱ्या ‘त्या’ चिमुरड्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले )

देशातील सर्वात मोठा FPO

अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेसचा हा एफपीओ तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा होता. याचे कारण देताना गौतम अदानी म्हणाले की, बाजारातील अस्थिरता पाहता FPO आणणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे बोर्डाला मनापासून वाटत होते. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश आहे. 20 हजार कोटी रुपयांचा हा FPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी ओपन करण्यात आला होता आणि पूर्ण सबस्क्राइब झाल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत बंद झाला होता. देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एफपीओ होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.