२२ सप्टेंबरपासून या सहकारी बॅंकेला लागणार टाळं, RBI ची कारवाई

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पुण्यातील रूपी सहकारी बॅंक बंद करण्याचे आदेश दिल्याने या बॅंकेच्या सेवा २२ सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहेत. या बॅंकेतून ग्राहकांनी आपले पैसे काढून घ्यावेत अशी सूचना आरबीआयने दिली आहे. २२ सप्टेंबरनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत असेही आरबीआयने सांगितले आहे.

( हेही वाचा : रेल्वेचा स्टाफ असल्याचे सांगत, त्याने तब्बल 23 वर्षे केला विनातिकीट प्रवास)

आरबीआयची कारवाई 

रुपी बॅंकेची आर्थिक स्थिती वाईट असल्याने आरबीआयने रुपी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. रुपी बॅंकेने आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. यामुळे या बॅंकेवर कारवाई करण्यात आली आहे. RBI ने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार या रुपी बॅंकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच कमाईचे साधन आणि कमाईची शक्यता देखील नाही. त्यामुळे बॅंकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ५६सह कलम ११(१) आणि कलम २२ (३)(d) च्या तरुतुदींचे पालन झालेलं नाही हे स्पष्ट होते. बॅंकेचे चालू राहणे ठेवीदारांच्या हितासाठी चांगले नसून, सध्या बॅंकेची आर्थिक स्थिती पाहता बॅंक तिच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकत नाही. बॅंकेला बॅंकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होईल यामुळेच आरबीआयने ही बॅंक बंद करण्याचे आदेश देत ही कारवाई केली आहे. RBI ने बॅंक बंद होणार याची माहिती ग्राहकांना ऑगस्टमध्ये दिली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here