RBI Tokenization Rule: क्रेडिट, डेबिट कार्डने पेमेंट करताय? पुढील महिन्यापासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

148

तुम्ही जर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण येत्या ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युजर्ससाठी कार्ड ऑन फाइल टोकनायझेशन नियम आणणार असल्याचे सांगितले जात आहे. देशात होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आरबीआय पुढील महिन्यापासून काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युजर्ससाठी कार्ड ऑन फाइल टोकनायझेशन हा नियम आरबीआय यापूर्वी १ जानेवारी २०२० पासून लागू करणार होती. पण ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून ३० जून केली होती. नंतर आरबीआयने आपली अंतिम मुदत पुन्हा १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली आहे.

सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड ऑनलाईन, पॉईंट ऑफ सेल आणि अॅपमधील व्यवहार एकामध्ये एकत्र करून आरबीआय एकच टोकन जारी करणार असल्याचे सांगितले आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यवहारासाठी तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरतात तेव्हा व्यवहार १८ कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीसीटिव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. जेव्हा ही सर्व माहिती भरली जाते, तेव्हाच एखादा व्यवहार पूर्ण होतो.

काय होणार बदल

टोकनायझेशन कार्डचा तपशील टोकन नावाच्या पर्यायी कोडमध्ये रूपांतरीत केले जाईल, हे टोकन कार्ड टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाईसवर अवलंबून असणार आहे. जेव्हा कार्डचा तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा सायबर क्राईम, फसवणूकीचा धोका कमी होतो. ज्यावेळी तुम्ही तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर कराल तेव्हा तुमच्या धोका देखील टळतो.

टोकनायझेशन म्हणजे यामध्ये तुमच्या कार्डची माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होईल. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या कार्डचा सीव्हीव्ही नंबर आणि वन टाईम पासवर्ड देखील आवश्यक असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.