भारतीय चलनी नोटांवर गांधींसोबतच आता इतरही महापुरुषांचे फोटो झळकणार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येत आहे. यासाठी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या Reserve Bank of India ने तयारी केली असल्याचे यात म्हटले होते. याबाबत आता RBI कडून खुलासा करण्यात आला आहे. चलनी नोटांवरील फोटोंमध्ये अशाप्रकारे कुठलाही बदल करण्याचा प्रस्ताव नसल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
(हेही वाचाः विचारही केला नसेल अशा देशातून भारतात आली राज्यसभा निवडणुकीची पद्धत)
आरबीआयने केला खुलासा
भारतीय नोटांवर गांधींसोबतच भारतीय राष्ट्रगीताचे जनक रविंद्रनाथ टागोर आणि भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे फोटो झळकणर असल्याची माहिती सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत होती. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण आता स्वतः RBI ने माहिती देत ही माहिती खोटी असल्याचा खुलासा केला आहे. रिजर्व्ह बँकेकडून असा कुठलाही प्रस्ताव ठेवणात आला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असा खुलासा RBIने एका वृत्ताद्वारे केला आहे. त्यामुळे अशा कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, अस् आवाहनही RBI कडून सांगण्यात आले आहे.
RBI clarifies: No change in existing Currency and Banknoteshttps://t.co/OmjaKDEuat
— ReserveBankOfIndia (@RBI) June 6, 2022
(हेही वाचाः खोट्या नोटा वाढल्या! RBI ने सांगितली धक्कादायक आकडेवारी)
काय होते वृत्त?
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय चलनी नोटांवर गांधींसोबतच इतरही महापुरुषांचे फोटो झळकणार आहेत. यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिजर्व्ह बँक एकत्रितपणे काम करणार असून, लवकरच याबाबतचा निर्णय अधिकृतरित्या घेण्यात येणार आहे. नोटांवर छापण्यासाठी रविंद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क तयार करण्यात आले असून, ते नोटा छापणारी संस्था Security Printing and Minting Corporation of India(SPMCIL)कडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
Join Our WhatsApp Community