RBI Grade B : रिझर्व्ह बँकेच्या ब श्रेणीतील अधिकाऱ्याला मिळतो इतका पगार

RBI Grade B : रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून रुजू व्हायचं असेल तर ही पहिली परीक्षा आहे

135
RBI Gold Recovery : रिझर्व्ह बँकेनं लंडन बँकेत ठेवलेलं १०२ टन सोनं आणलं भारतात 
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच रिझर्व्ह बँक या देशाच्या मध्यवर्ती बँकेनं ब श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आवेदनं मागितली आहेत. १७ ऑगस्ट रोजी आवेदन करण्याची मुदतही संपली आहे. इथून पुढे अर्जांची छाननी आणि तिहेरी निवड चाचणी स्पर्धा सुरू होईल. रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून काम करण्यासाठी ही पहिली पायरी मानली जाते. त्यामुळे दरवर्षी या परीक्षेची वाट उमेदवार पाहत असतात. अर्थात, ही परीक्षा तशी सोपी नाही. तीन पायऱ्यांवर परीक्षेसाठीची  निवड प्रक्रिया होते. (RBI Grade B)

(हेही वाचा- Badlapur abuse case प्रकरणी आरोपी अक्षयच्या आई-वडिलांचा दावा काय?)

सुरुवातीला प्रिलिम, दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुलाखत असं या परिक्षेचं स्वरुप आहे. या तीनही फेऱ्या पूर्ण झाल्यावरच तुम्हाला रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळू शकते. तीनही टप्प्यातील गुणांचं एकत्रीकरण करून विजयी उमेदवारांची यादी तयार केली जाते. (RBI Grade B)

रिझर्व्ह बँकेचा ब श्रेणीतील अधिकारी हा बँकिंग यंत्रणेवर लक्ष ठेवणारा पहिला अधिकारी असतो. बँकिंग कायदा १९४९ चं पालन वित्तीय संस्था करत आहेत की नाही, लोकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत की नाही हे पाहणं हे या अधिकाऱ्याचं महत्त्वाचं काम आहे. रिझर्व्ह बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत जबाबदाऱ्या सतत फिरत्या राहतात. त्यामुळे विभागांअंतर्गत बदल्यांसाठी या पदावरील व्यक्तीला तयार रहावं लागतं. (RBI Grade B)

(हेही वाचा- Maharashtra : महाराष्ट्रातील पहिल्या राज्यगीत शिल्पाचे अनावरण)

रिझर्व्ह बँकेच्या ब श्रेणीतील अधिकाऱ्याचा पगार हा १,२२,००० रुपयांपर्यंत असतो. यात मूलभूत पगार ५५,००० रुपये, महागाई भत्ता, घऱभाडे भत्ता असे विविध भत्ते समाविष्ट आहेत. ३० वर्षांच्या आतील स्नातकोत्तर पदवीधर आणि भारतीय नागरिक या पदासाठी अर्ज करू शकतात. (RBI Grade B)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.