कोरोना काळात मागील २ वर्षे रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडू नये, म्हणून त्यांच्या रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता रिझर्व्ह बँकेने यंदा रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा रेपो दर ४० पॉइंट्सने वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागणार आहेत.
महागाईमुळे रेपो दरात वाढ झाली
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत घेऊन रेपो रेट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रिझर्व्ह बँकेने २ मे आणि ४ मे रोजी बैठक घेतली. त्यामध्ये ४० बेसिस पॉइंट्सने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी रेपो दर ४ टक्के होता, तो आता ४.४० टक्के होईल, असे दास म्हणाले. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा ‘या’ मशिदींवर कारवाई कधी होणार? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी)
एफडी गुंतवणुकदारांना फायदा होणार
अनियंत्रित महागाईमुळे हा रेपो दर वाढवण्यात आला आहे. मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि ती थेट ७ टक्क्यांवर पोहोचली, असे दास यांनी सांगितले. या व्याज दरवाढीमुळे कर्जाच्या हप्त्यांतही वाढ होणार आहे. रेपो दरात शेवटची कपात मे २०२० मध्ये झाली होती आणि तेव्हापासून तो तसाच ठेवण्यात आला होता. कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये ५० बीपीएसने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे व्याज दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. एफडी गुंतवणूकदारांना या वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आ
Join Our WhatsApp Community