विविध बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नऊ सहकारी बँकांना साधारण 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 9 बँकांना 11.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या 9 बँकांपैकी काही सहकारी बँकांची नावे आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी, आणि काही त्रुटी राहिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा या कारवाईमागचा उद्देश नसल्याचेही बँकेने म्हटले आहे.
(हेही वाचा – Amazon धर्मांतरासाठी निधी पुरवते! RSS शी संलग्न असलेल्या मासिकाचा दावा)
कोणत्या बँकांना किती झाला दंड
रिझर्व्ह बँकेकडून बेरहामपूर सहकारी अर्बन बँक (ओडिशा) यांना 3.10 लाख रुपये, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला 2.5 लाख रुपये, महाराष्ट्र आणि संतरामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरातला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, मध्य प्रदेश, जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., झारखंड आणि रेणुका नागरी सहकारी बँक, छत्तीसगड यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या बँकांवरही ठोठावला दंड
तर कृष्णा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मध्य प्रदेश आणि केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशा यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरातला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community