2 हजाराच्या नोटांबाबत RBI चा धक्कादायक खुलासा

93

नोव्हेंबर 2016 मध्ये मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनबाह्य झाल्या. त्यानंतर 2 हजार रुपयांच्या नव्या गुलाबी नोटा चलनात आल्या. आता याच दोन हजाराच्या नोटा कमी होत असल्याचे निरीक्षण आरबीआयकडून नोंदवण्यात आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये मोठी घट होत असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये एकूण 12.6 टक्क्यांची घट झाल्याचे निरीक्षण आरबीआयने नोंदवले आहे.

(हेही वाचाः खोट्या नोटा वाढल्या! RBI ने सांगितली धक्कादायक आकडेवारी)

नव्या नोटांमध्ये घट

सध्या बाजारात 2 हजार रुपयांच्या एकूण 21 हजार 420 लाख नोटा आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात ही संख्या 24 हजार 510 लाख इतकी होती. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 27 हजार 398 लाख इतका होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये चलनातील 2 हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत 21.81 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे. आरबीआयकडून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे ही घट झाल्याचे म्हटले जात आहे.

500 रुपयांच्या नोटांमध्ये वाढ

असे असतानाच दुसरीकडे मात्र 500 रुपयांच्या नवीन नोटांमध्ये मात्र मार्च 2022 मध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात 455,468 लाख 500 रुपयांच्या नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात 386,790 लाख नोटा होत्या, अशी माहिती आरबीआयकडून अहवालात देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने 500 रुपयांच्या नव्या नोटांचा पुरवठा केल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः आता Credit Card चे बिल तुमच्या सोयीनुसार भरा, RBI चा मोठा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.