राज्यातील पाच सहकारी बँकांवर आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कारवाई करत दंड ठोठावला आहे. त्या बँकांनी आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, (RBI) इंदापूर को – ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Thane Power Block : ‘या’ स्थानकावर दोन दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक)
म्हणून आरबीआयने केली कारवाई
१. इंदापूर सहकारी बँक आणि पुणे बँके – तब्बल ५ लाखांचा दंड. ठेव खाते आणि किमान शिल्लक देखभाल या नियमांकडे दुर्लक्ष
२. जनकल्याण को – ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड , मुंबई – ५ लाखांचा दंड. क्रेडिट माहितीच्या नियमांचे पालन न केल्याने भरावा लागला दंड.
३. पाटण अर्बन को – ऑपरेटीव्ह बँक, सातारा – २ लाखांचा दंड. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI)
(हेही वाचा – Shree Siddhivinayak Mandir Trust: श्रीसिद्धिविनायक न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, भाविकांना घेता येणार सुरळीत दर्शन)
४. पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड – १ लाखांचा दंड. ठेवी खात्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
५. पुणे महानगरपालिका सर्व्हंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँक – १ लाख रुपयांचा दंड. निष्क्रिय खात्यांबाबत योग्य माहिती न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (RBI)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारी, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी)
बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आरबीआयचा (RBI) कोणताही हेतु नाही. त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या सर्व बँका आणि त्याचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहतील असे आरबीआयने (RBI) स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community