नियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४ बँकांना रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन आणि राजस्थान व तामिळनाडूतील प्रत्येकी एका बँकेचा समावेश आहे. आरबीआयने (RBI) या बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील काही बँकांवर कडक कारवाई केली आहे. यात काही बँकांचे परवाने रद्द करण्यात आले असून इतर बँकांवर ठराविक काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. परवाना रद्द झालेल्या बँकांतील ग्राहकांच्या ठराविक रक्कमेला विमा संरक्षण आहे. रिझर्व्ह बँक आपल्या निरिक्षणाखाली बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेते.
हेही पहा –
रिझर्व्ह बँकेने (RBI) घातलेले निर्बंधांचे पालन करणे बँकांना बंधनकारक असते. बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला (RBI) द्यावी लागते. परंतु, ताळमेळ्यात विसंगती आढळल्यास रिझर्व्ह बँक (RBI) संबंधित बँकांवर कारवाई करु शकते. त्यानुसार पुण्यातील जनता सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने (RBI) १३ लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय तामिळनाडू शिखर सहकारी बँकेला १६ लाखांचा, बॉम्बे मर्कंन्टाईल को आँपरेटिव्ह बँकेला १३ लाखांचा आणि राजस्थानातील बरण नागरिक सहकारी बँकेला २ लाखांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याने गुंतवणूकदारांनी घाबरुन जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community