शेतकरी-कष्टक-यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प!

124

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यंदाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारमण यांनी मांडल्यावर, यावर राजकीय पातळीवर प्रतिक्रिया येत आहेत. तर, जाणून घेऊया या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाविषयी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.

( हेही वाचा : Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग? वाचा… )

फडणवीस यांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून हा अर्थसंकल्प हा शेतकरी-कष्टक-यांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. असे ट्वीट करत, देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडेल – राजनाथ सिंह

जमीन सुधारणांचे डिजिटलायझेशनमुळे (Digitalisation of land reforms) भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडेल. या अर्थसंकल्पामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. असे ट्वीट करत, या वर्षीच्या अर्थसंकल्पातील घोषणांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वागत केले आहे.

( हेही वाचा : Budget 2022: तरूणांना दिलासा! 60 लाख नव्या रोजगाराच्या संधी )

दूरदर्शी अर्थसंकल्प – अमित शहा 

मोदी सरकारने आणलेला हा अर्थसंकल्प दूरदर्शी आहे, यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार बदलेल. हा अर्थसंकल्प भारताला स्वावलंबी बनवत, स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात नव्या भारताचा पाया असेल. असे ट्वीट करत, गृहमंत्री अमित शहा यांनी निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

देशाच्या विकासाला गतीमान करणारं डिजिटल बजेट- चित्रा वाघ

देशाच्या विकासाला गतीमान करणारं डिजिटल बजेट असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

( हेही वाचा : Budget 2022 : आता टीव्हीद्वारे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण )

भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदाचाही अर्थसंकल्प हा देशातील सर्व घटकांना सामावून घेणारा आणि भारताला आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणारा असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.