महापालिका शाळांमध्ये भगवत गीता पठन… भाजपची ‘ही’ मागणी मान्य होईल का?

111

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठनही करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली आहे. भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबदद्ल केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे यासाठी मराठी शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे अशी मागणी भाजपच्या नगरसेविका योगीता कोळी यांनी आपल्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय भाषणांत केली आहे.

( हेही वाचा : मनसे जनतेसमोर नव्या स्टाईलमध्ये…कोणती आहे ती स्टाईल? )

भगवत गीतेचे पठन केले जावे

मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या बैठकीत मांडण्यात आल्यानंतर यावर सध्या चर्चा सुरु आहे. या अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना भाजपच्या योगीता कोळी यांनी शिक्षणाच्यादृष्टीकोनातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेताना मनोरी मालवणी चर्च येथील शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. तसेच स्कील डेव्हलपमेंटवर भर देण्याची सूचना केली आहे. या सूचनांबरोबरच महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील मुलांना भगवत गीतेचे पठन केले जावे अशीही मागणी केली आहे.

मुलींना सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध व्हावे

शाळांचा पाया हा बालवाडी वर्गावर उभारला जात असून महापालिका शाळांमध्ये अधिकधिक मुलांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून बालवाडीच्या वर्गांची संख्याही वाढवण्यात यावी अशीही मागणी केली आहे. विशेषत: गावठाणांमध्ये या बालवाडी सुरु करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली. चिंचोली शताब्दी शाळेतील पटांगणांमध्ये खेळाची साहित्य नसून ही साहित्य मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली जावी अशीही मागणी केली आहे. महापालिका शाळांमध्ये आठवीच्या मुलींना सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध व्हावे म्हणून सॅनिटरी व्हेंडींग मशीन्स बसवण्यात आल्या आहेत, त्यातील मशीन्स आज कार्यान्वित नाही. त्यामुळे या मशीन्स कार्यान्वित करून मुलींना सॅनिटरी नॅपकीन्स पुरवण्याची सुविधा दिली जावी, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले.

( हेही वाचा : पुन्हा चायनामधूनच अनेस्थेशिया मशिन्सची खरेदी : अडकणार का वादात? )

तसेच राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहायक अनुदानापोटी ४८४० कोटी रुपये येणे थकीत आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी शिक्षण विभागाने राज्य शासनासोबत पत्रव्यवहार करत ही थकीत रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करावा अशीही सूचना केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.