संत हनुमान तुलसीदासजी यांनी ज्याप्रमाणे रामचरितमानस या ग्रंथाचे लेखन केले. त्याचप्रमाणे त्यांनी रचलेली हनुमान चालिसा जनमानसात प्रचलित आहे आणि हनुमान चालिसा म्हणण्याचे पुष्कळ फायदेदेखील आहेत. हनुमान चालीसा वाचल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात. असे बरेच लोक आहेत ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की हनुमान चालीसा वाचल्याने कोणते फायदे होतात. (Hanuman Chalisa)
हनुमान चालिसा म्हणजे काय?
संत तुलसीदास यांनी हनुमंताचे गुण गाण्यासाठी ४० चौपाई (म्हणजे आपण मराठीत श्लोक म्हणुया) असलेल्या कवयाची निर्मिती केली. यामध्ये हनुमंताच्या विविध गुणांचे वर्णन आहे. ४० चौपाई म्हणून यास चालिसा असे नाव देण्यात आले. अध्यात्मिक जगतात विविध देवतांवर विविध संत कवींनी चालिसा रचलेली आहे. (Hanuman Chalisa)
हनुमान चालिसा वाचण्याचे फायदे
१. भूत पिशाच निकट नही आवें:
ज्या लोकांना भूत, प्रेत आणि करणी किंवा तत्सव बाधांचा त्रास होतो, अशा लोकांनी रोज हनुमान चालिसाचा वाचलीच पाहिजे. कारण हनुमानाचं नाव उच्चारताच भूत, प्रेत १०० पावलं दूर पळतात. “भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे” असं हनुमान चालिसामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. याचा अर्थ जो हनुमानाचा भक्तीने पाठ करतो त्याच्याजवळ कधीही भूत आणि प्रेत येणार नाहीत आणि काळ्या जादूपासून देखील त्याला संरक्षण प्राप्त होते. (Hanuman Chalisa)
२. पापांपासून मुक्तता:
मनुष्य म्हटला की काही चांगली कर्मे तर काही वाईट कर्मे हातून घडणारच. मात्र कधीकधी कळत नकळत आपल्या हातून गंभीर चुका घडतात. त्या पापातून मुक्त होण्यासाठी ज्या व्यक्तिला आपल्याकडून त्रास देण्यात आला आहे, त्या व्यक्तीची क्षमा मागून तसेच इतर कर्मांप्रती देखील क्षमायाचना करुन हनुमाच्या मूर्ती अथवा फोटोसमोर बसून हनुमान चालीसाचे पठण केल्याने पापांसून मुक्ती मिळते. (Hanuman Chalisa)
३. तणावाला म्हणा बाय बाय:
दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर आपलं आजचं आयुष्य इतकं जलद झालं आहे की आपण सतत तणावाखाली असतो. म्हणून अशा परिस्थिती रोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण केल्याने आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. हनुमान चालीसा पठणाने आपल्या मनाला शांतता प्राप्त होते. हनुमान चालीसा आपल्याला दिवसभर आनंदी राहण्यास मदत करते, त्यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला होतो. त्याचबरोबर आपल्या प्रचंड ऊर्जा प्राप्त होते. जेणेकरुन आपल्यामध्ये उत्साह संचारतो. (Hanuman Chalisa)
(हेही वाचा – Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नूला केले दहशतवादी घोषित )
४. साडेसातीचा त्रास दूर होतो:
ज्योतिष विद्येत साडेसातीला महत्व आहे. या काळात माणसाचं आयुष्य हलून जातं. असं म्हणतात की या काळात प्रचंड सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण शनी महाराज या काळात न्याय करण्याची प्रक्रिया करत असतात. शनी महाराजांना दुष्टता, लबाडी आवडत नाही. त्यामुळे या काळात ते दंडही देतात. मात्र कधीकधी आपल्या असे वाटते की आपण सत्याने वागतोय आणि आपले काही चांगले होत नाही. अशा वेळेस हनुमंताला शरण गेले पाहिजे. एक अकथेनुसार हनुमानाने शनिदेवाचे प्राण वाचवले होते, त्यानंतर शनिदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की आजपासून मी कोणत्याही हनुमान भक्ताचे कोणतेही नुकसान करणार नाही. त्यामुळे साडेसातीच्या काळात हनुमान चालिसा अवश्य वाचा. (Hanuman Chalisa)
५. कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय – हनुमान चालिसा:
त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही समस्येवर हनुमान चालिसा पठणाचा उपाय करु शकता. भय, चिंता, वाईट स्वप्ने पडत असतील, आजापासून सुटका मिळवायची असेल किंवा आर्थिक नुकसानीतून सावरायचे असले तरू तुम्ही हनुमंताचा शरण जाऊ शकता. अगदी तुमचा प्रवास सुखकर व्हावा असं वाटत असेल तरी गाडी बसून चालिसा म्हणू शकता. हनुमान हा चिरंजीव आहे आणि तो तुमच्या अवतीभोवतीच आहे, या भावनेने हनुमंताची उपासना करायची आहे. नक्कीच लाभ मिळेल. (Hanuman Chalisa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community