टिळक नगर, चेंबूर, मानखुर्दमधील नाल्यांवरील पुलांची पुनर्बांधणी

पूर्व उपनगरातील महापालिकेच्या टिळक नगर, चेंबूर या एम पश्चिम विभागात तसेच मानखुर्द गोवंडी या एम पूर्व विभागात नाल्यांवरील धोकादायक झालेल्या पुलांच्या पुनर्बांधकामाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार पुलांचे रुंदीकरण करण्यातही येणार असून पूर्व मुक्तमार्ग, सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता व घाटकोपर मानखुर्द रस्त्यावरील उड्डाणपूल यावरील काही पुलांची आपत्कालिन कामेही करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : अजित पवारांना बराच वेळ आहे, मला नाही – देवेंद्र फडणवीसांचा टोला )

टिळकनगर येथील लोकमान्य टिळक टर्मिनस, पाईपलाईन रस्ता उड्डाणपूलाजवळील पूल, पाईपलाईन रस्ता सर्वोदय बौध्द विहार जवळील पूल, पाईप लाईन रस्ता आराध्य टॉवर जवळील पूल, चेंबूर शेल कॉलनी रस्त्यावर असलेल्या श्रमजीवी नाल्यावरील पूल, चेंबूर ओसवाल कंपाऊंड, ओसवाल नाल्यावरील पूल, मानखुर्द पीएमजीपी व साठेनगर जोडणारा पीएमजीपी नाल्यावरील पूल या पुलांचे रुंदीकरणासह पुनर्बांधकाम केले जाणार आहे. याकरता विविध करांसह ५० कोटी रुपयांचे बांधकाम केले जाणार आहे. या कामांसाठी पिनाकी इंजिनअर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रशासनाच्या अंदाजित दरापेक्षा अधिक खर्चांची बोली लावून हे काम मिळवण्यात आले आहे. तर या पुलांच्या बांधकामासाठी टीपीएफ इंजिनिअरींग या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून त्यावर सुमारे ८० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या सर्व पुलांची कामे पावसाळा वगळून २४ महिन्यांमध्ये केली जाणार आहे. यासर्व कामांना प्रशासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ऑक्टोबरपासून कामे सुरु होतील असे पूल विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, पाईपलाईन रस्ता उड्डाणपूलाजवळील पूल

 • पुलाची लांबी : १८. ५० मीटर
 • पुलाच रुंदी : ८ मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

पाईपलाईन रस्ता सर्वोदय बौध्द विहार जवळील पूल

 • पुलाची लांबी : १२. २० मीटर
 • पुलाच रुंदी : ८ मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

पाईप लाईन रस्ता आराध्य टॉवर जवळील पूल

 • पुलाची लांबी : १८. ५० मीटर
 • पुलाच रुंदी : ८ मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

चेंबूर शेल कॉलनी रस्त्यावर असलेल्या श्रमजीवी नाल्यावरील पूल

 • पुलाची लांबी : १३. ४० मीटर
 • पुलाच रुंदी : ७.५ मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

चेंबूर ओसवाल कंपाऊंड, ओसवाल नाल्यावरील पूल

 • पुलाची लांबी : २७. ४५ मीटर
 • पुलाच रुंदी : १२.५० मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

मानखुर्द पीएमजीपी व साठेनगर जोडणारा पीएमजीपी नाल्यावरील पूल

 • पुलाची लांबी : ३२.०८ मीटर
 • पुलाच रुंदी : १२.५० मीटर
 • स्पॅन : ०१
 • पाया बांधकाम : पायलींग आरसीसी

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here