मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील सहायक जनसंपर्क अधिकाऱ्यांची रिक्त मागील अनेक वर्षांपासून असून याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावर होत आहे. त्यामुळे ही रिक्तपदे आता सरळ सेवेने भरली जाणार आहे. पाच रिक्तपदांसाठी लवकरच जाहिरात काढून या पदांसाठी अर्ज मागवले जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संवर्गातील एकूण ६ अनुसूचित पदे असून त्यातील ५ रिक्त पदे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवून भरले जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी सुमारे ७५० अर्ज प्राप्त होण्याची शक्यता जनसंपर्क विभागाने वर्तवली आहे.
(हेही वाचा – लवकरच मुंबई-नाशिक ‘मेमू’ लोकलने प्रवास करता येणार!)
या पाच रिक्त पदांच्या भरती आय. बी. पी. एस. या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी संगणकाच्या माध्यमातून पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क विभाग व जनसंज्ञापन या विषयाशी संबंधित २० गुणांची ऑनलाईन वस्तूनिष्ठ परीक्षा व उर्वरीत ८० गुणांपैंकी ४० गुणांची मराठी व ४० गुणांची इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेऊन त्यातील उच्च गुणवत्तेनुसार सरळसेवेने भरण्यात येणार आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीला ७ लाख ४५ हजार २३ रुपये मोजले जाणार आहे. याबाबतची भरती अर्ज मागवून करण्यासाठीचा प्रस्ताव जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे समितीच्या मंजुरीनंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पदांचे नाव : सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
- एकूण भरायची पदे : ०५
अर्जासोबत भरायचे शुल्क
- मागासवर्गीयांसाठी प्रत्येकी : १ हजार रुपये
- खुल्या वर्गांसाठी प्रत्येक : १२०० रुपये