तुम्ही जर बॅंकेत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण IDBI आणि IBPS बॅंकेत अनुक्रमे १ हजार ५४४ व ८ हजार १०६ पदांची भरती करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )
IDBI बॅंक भरती
IDBI बॅंकेत कार्यकारी व सहायक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ पदांच्या एकूण १ हजार ५४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.
अटी व नियम
पदाचे नाव – कार्यकारी, सहायक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ ( IDBI बॅंक PGDBF 2022-23)
पद संख्या – १ हजार ५४४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
अर्ज शुल्क – SC/ST/PWD उमेदवारांसाठी २०० रुपये, इतर सर्व उमेदवारांसाठी १००० रुपये
वयोमर्यादा
कार्यकारी – २० ते २५ वर्ष
सहायक व्यवस्थापक – २१ ते २८ वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ जून २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०२२
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
IBPS बॅंकेत भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग कार्मिक सिलेक्शन(IBPS)कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत गट ‘अ’ अधिकारी आणि गट ‘ब’ कार्यालय सहायक पदांच्या एकूण ८ हजार १०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नियम व अटी
- पदाचे नाव – गट A अधिकारी ( स्केल- I, II आणि III) आणि गट B कार्यालय सहायक.
- पद संख्या – ८ हजार १०६ जागा.
- अर्ज पद्धती – ऑनलाइन.
- अर्ज शुल्क – SC/ST/ PWBD उमेदवारांसाठी १७५ रुपये, इतर सर्वांसाठी – ८५० रुपये.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ जून २०२२.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२.
- अधिकृत वेबसाईट – www.ibps.in