बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! IDBI आणि IBPS बॅंकेत बंपर भरती, लगेच भरा अर्ज

तुम्ही जर बॅंकेत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण IDBI आणि IBPS बॅंकेत अनुक्रमे १ हजार ५४४ व ८ हजार १०६ पदांची भरती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )

IDBI बॅंक भरती 

IDBI बॅंकेत कार्यकारी व सहायक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ पदांच्या एकूण १ हजार ५४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.

अटी व नियम

पदाचे नाव – कार्यकारी, सहायक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ ( IDBI बॅंक PGDBF 2022-23)
पद संख्या – १ हजार ५४४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
अर्ज शुल्क – SC/ST/PWD उमेदवारांसाठी २०० रुपये, इतर सर्व उमेदवारांसाठी १००० रुपये
वयोमर्यादा
कार्यकारी – २० ते २५ वर्ष
सहायक व्यवस्थापक – २१ ते २८ वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ जून २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०२२
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

IBPS बॅंकेत भरती 

इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग कार्मिक सिलेक्शन(IBPS)कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत गट ‘अ’ अधिकारी आणि गट ‘ब’ कार्यालय सहायक पदांच्या एकूण ८ हजार १०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नियम व अटी 

  • पदाचे नाव – गट A अधिकारी ( स्केल- I, II आणि III) आणि गट B कार्यालय सहायक.
  • पद संख्या – ८ हजार १०६ जागा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन.
  • अर्ज शुल्क – SC/ST/ PWBD उमेदवारांसाठी १७५ रुपये, इतर सर्वांसाठी – ८५० रुपये.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ जून २०२२.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here