१० वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! ३६१२ रिक्त पदांची भरती

108

लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण ३ हजार ६१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२२ आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वे स्थानकांवर लावले जाणार ९०० CCTV कॅमेरे!)

नियम व अटी

  • पदाचे नाव – अप्रेंटीस ( Apprentices)
  • पद संख्या – ३ हजार ६१२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/HSC/ITI certificate
  • वयोमर्यादा – १५ ते २४ वर्ष
  • अर्ज शुल्क – १०० रुपये
  • अर्ज पद्धती -ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ मे २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२
  • अधिकृत वेबसाइट – www.wr.indianrailway.gov.in
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

New Project 10 13

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.wr.indianrailway.gov.i वर अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.