किम जोंग उनचं अजब फर्मान! रेड लिपस्टिकवर बंदी, पण कारण काय?

162

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या विचित्र आणि अजब निर्णयांबद्दल आपण वारंवार ऐकत असतो. कारण देशातील नागरिकांसाठी अनोखे फर्मान काढत असल्याने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच चर्चेत राहतो. हुकूमशहा किन जोंग उन यांच्या सरकारचे जनतेवर तसेच नागरिकांच्या खाजगी जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे तेथील लोक त्या निर्बंधांसह जीवन जगत आहेत. अशातच किम जोंगने अजब फर्मान काढल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियामध्ये महिलांचे सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर रेड लिपस्टिकसह महिलांनी सौंदर्य प्रसाधने म्हणजेच मेकअपचे साहित्य वापरण्यावरही बंदी घातले आहे. असं अजब फर्मान काढण्यामागचे कारण ऐकूनही तुम्ही थक्क व्हाल.

(हेही वाचा- शिकावू, अनुभवी आणि निवृत्त परिचारिकांना महापालिकेत पुन्हा संधी : अशी आहे महापालिकेची ऑफर)

मेकअप हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. महिलांच्या मेकअपचा लिपस्टिक हा फार महत्त्वाचा भाग आहे. मात्र उत्तर कोरियात महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घातली आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने उत्तर कोरियामध्ये लाल रंग भांडवलशाहीशी संबंधित आहे, त्यामुळे या रंगाची लिपस्टिक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लिपस्टिकवर बंदी घालण्याचे कारण काय?

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन नेहमीच नागरिकांसाठी विचित्र अजब फर्मान लागू करतो. अशातच एका अहवालानुसार, लाल रंग भांडवलशाही, कम्युनिस्ट आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद यांचे प्रतिक मानले जाते. व्यक्ती स्वातंत्र्यवाद म्हणजे स्वतः पेक्षा अन्य कोणीही मोठा नाही, अशी भावना आहे. यामुळे उत्तर कोरियात लाल रंगाची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या अजब फर्मानचं कोण पालन करतंय की नाही हे तपासण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. ही पेट्रोलिंग टीम दररोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते. हे पथक महिलांचे सामान तपासून त्यात रेड लिपस्टिक असेल तर जप्त केली जाते. नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जाते आणि दंडही मोठा आकारला जातो.

या गोष्टींवरही आहे बंदी

उत्तर कोरियामध्ये लाल रंगाच्या लिपस्टिकसह महिलांना केसांना रंग लावण्याचीही परवानगी नाही, कारण केसांना कलर करणे सरकारच्या विरोधात असल्याचे मानले जाते. स्त्रियांना त्यांचे मोकळे सोडण्याचीही परवानगी नाही. चेन, अंगठी, ब्रेसलेट असे दागिने घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.