शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून लाल सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आमदारांच्या गोटात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे.
(हेही वाचा – Gujarat Assembly election 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, काय आहे आरोप?)
‘जी२०’ परिषदेच्या अयोजनासंदर्भात सोमवारी नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यात सहभागी झाले. बैठकीनंतर भाजपाचे संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी शिंदे यांच्याशी खासगीत चर्चा केली. सरकारमधील अस्थिरता तात्काळ दूर करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अस्थिरता आपल्यासाठी धोक्याची ठरणार आहे. त्यामुळे आधी सरकार स्थिर करा आणि त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घ्या, असा निरोप त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाच्या वतीने शिंदे यांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बंडोबांना थंड कसे करणार?
– मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने बंडोबांना थंड कसे करायचे, असा पेच शिंदे-फडणवीसांसमोर निर्माण झाला आहे.
– त्यामुळे नाराज आमदारांना थोपविण्यासाठी महामंडळाच्या नियुक्तीबाबतच्या हालचालींना गती देण्यात आली आहे.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली.
– या बैठकीत राज्यातील १२० महामंडळांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, दोन टप्प्यांत महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
– यात पहिल्या टप्प्यात एकूण ६० महामंडळांची घोषणा केली जाणार असून, भाजपला ३६ तर शिंदे गटाला २४ महामंडळे मिळतील.
Join Our WhatsApp Community