पावसाळ्यातील कामांची नियमित पाहणी करा; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे सर्व सहायक आयुक्तांना निर्देश

124

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करण्यात यावी तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आणि पाऊस सुरू असताना वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुरळीतपणे व अव्याहतपणे सुरू राहावी याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत दिले. याशिवाय रस्त्यांवर झाडे पडल्यास किंवा दरडीसारखी दुघर्टना घडल्यास तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.

विविध स्तरीय कामे सुरू

येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरीय कामे सुरू आहेत. या सर्व कामांची नियमितपणे पाहणी करावी, तसेच आपापल्या क्षेत्रात असलेल्या विविध यंत्रणांशी सुसमन्वय साधावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आश्विनी भिडे आणि मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आणि महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी पावसाळ्या दरम्यान झाड पडल्यास बाबत दरवर्षीच्या पद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उद्यान खात्याला दिले. तर दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. धोकादायक इमारतींबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’नुसार निर्धारित कार्यवाही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी, असेही त्यांनी संबंधित खात्याला या बैठकीत दरम्यान आदेशित केले आहे.

New Project 37

या बैठकीच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान नार्वेकर यांनी प्रामुख्याने या वर्षातील घडामोडींची माहिती उपस्थितांना दिली. या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात पडलेला पाऊस, रेल्वे सह विविध वाहतूक सुविधांची माहिती, अपघात, झाडे पडणे इत्यादी बाबतची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीदरम्यान येत्या पावसाळ्यातील समुद्राला येणाऱ्या मोठ्याभरतीचे दिवसांना दरवर्षीच्या पद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, विभाग कार्यालय व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांना दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.