Rekha Jhunjhunwala Net Worth : सौ राकेश झुनझुनवाला ते रेखा झुनझुनवाला ही ओळख कशी निर्माण केली?

Rekha Jhunjhunwala Net Worth : फोर्ब्सच्या यादीत शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये त्या पहिल्या पाच महिलांपैकी एक आहेत 

104
Rekha Jhunjhunwala Net Worth : सौ राकेश झुनझुनवाला ते रेखा झुनझुनवाला ही ओळख कशी निर्माण केली?
Rekha Jhunjhunwala Net Worth : सौ राकेश झुनझुनवाला ते रेखा झुनझुनवाला ही ओळख कशी निर्माण केली?
  • ऋजुता लुकतुके

ऑक्टोबर २०२१ मध्ये नवी दिल्लीत एका कार्यक्रमात राकेश झुनझुनवाला यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. ‘तुमच्या मालकीच्या शेअरची बाजारातील किंमत आता ४०,००० कोटी रुपये…’ झुनझुनवाला यांनी तो प्रश्न पूर्णच होऊ दिला नाही. आणि ते उद्गारले, ‘जर तुम्ही मोजू शकत असाल तर तुमच्याकडे ती गोष्ट नसेलच. प्रसिद्ध तेल उद्योजक जॉन पॉल गेटी यांचं हे वाक्य आत्मविश्वासाने झुनझुनवाला यांनी उच्चारलं होतं. त्यांचं कर्तृत्वच एवढं होतं की, यावर कुणीच शंका घेण्याचं कारण नव्हतं. पुढे हेच उत्तर पूर्ण करताना झुनझुनवाला म्हणाले होते, ‘कुणाला इथं पैसे मोजायचे आहेत! माझी पत्नी आणि मी एवढेच या संपत्तीचे भागीदार आहोत. पत्नीला पैशात अजिबात रस नाही.’ (Rekha Jhunjhunwala Net Worth)

(हेही वाचा- Sudha Murty : जमिनीशी नातं असलेलं आभाळाएवढं व्यक्तिमत्व)

हा कार्यक्रम पार पडल्यानंतर एका वर्षाने म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये राकेश झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala Net Worth) यांचा ६१ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाची पहिली दोन अक्षरं घेऊन त्यांनी एक कंपनी स्थापन केली होती. आणि तिचं नाव होतं रेअर एंटरप्रायझेस, याच कंपनी मार्फत ते गुंतवणूक करत होते. ही कंपनी अलगदपणे आता पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या हातात पडली.

पती निधनाचं दु:ख होतंच. पण, एका रात्रीत त्या जवळ जवळ ४०,००० कोटी रुपयांच्या वर पोर्टफोलिओच्या एकुलत्या एक मालकीण झाल्या होत्या. इतकंच नाही तर पैशात रस नसलेल्या त्यांना आता तो घेणं भाग पडलं होतं. (Rekha Jhunjhunwala Net Worth)

(हेही वाचा- भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक Rakesh Pal यांचे चेन्नईत निधन)

वाणिज्य अभ्यासक्रमात पदवी घेतल्यामुळे असेल आणि नवऱ्याकडून शेअर बाजाराचं बाळकडू मिळाल्यामुळे असेल त्यांनी आपल्या पोर्टपोलिओची जबाबदारी स्वत: स्वीकारली. डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत लाभांश आणि इतर मिळकत तसंच शेअरच्या वाढलेल्या किमती मिळून त्यांनी ४९ टक्के नफा मिळवला. (Rekha Jhunjhunwala Net Worth)

आता राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ही ओळख पुसून रेखा झुनझुनवाला अशी स्वत:ची ओळख निर्माण झाली होती.

(हेही वाचा- Sion Hospital मध्ये महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण, निवासी डॉक्टर संतप्त)

राकेश यांच्या पश्चात भारतीय शेअर बाजारातील वॉरन बफे म्हणून रेखा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. काही नवीन गुंतवणूक त्यांनी विश्वासाने केल्या. आणि काहींतून पैसे काढूनही घेतले. सध्या २६ कंपन्यांमध्ये त्यांची भाग भांडवलाच्या १ टक्के गुंतवणूक आहे. यात टायटन ही राकेश यांची लाडकी कंपनी तर एलआयसी ही कंपनीही आहे. (Rekha Jhunjhunwala Net Worth)

रेखा यांची एकूण मालमत्ता आता ८३० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात गेली आहे. रेखा झुनझुनवाला यांचं वय सध्या ६० वर्षं इतकं आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्या २९८ व्या क्रमांकावर आहेत. तेच भारतात श्रीमंतांच्या यादीत त्या २८ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपूर्ण मालमत्ता ही शेअर बाजार आणि कंपन्यांमधील गुंतवणुकीतून उभी राहिली आहे. शेअर बाजारातून कमाई होत असलेल्या भारतीय गुंतवणूकदारांमध्ये त्या पहिल्या पाचांत आहेत. इथं राधाकिशन दमानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. (Rekha Jhunjhunwala Net Worth)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता)

पतीच्या निधनानंतर रेखा यांनी शेअर बाजारातही जम बसवला असून जवळ जवळ २.४ कोटी रुपये त्यांना लाभांशाच्या रुपातच मिळतात. तर मागच्या वर्षभरात मुंबईत त्यांनी ८६८ कोटी रुपयांची उलाढाल रिअल इस्टेट क्षेत्रातही केली आहे. (Rekha Jhunjhunwala Net Worth)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.