Reliance – Disney Deal : रिलायन्सच्या ताफ्यात आणखी एक मनोरंजनविश्वातील ब्रँड

148
Disney-Reliance Merger : डिस्ने, रिलायन्स विलिनीकरण नजरेच्या टप्प्यात

ऋजुता लुकतुके

भारतीय मनोरंजन विश्वात एक मोठी उलाढाल होऊ घातलीय. तोट्यात असलेल्या डिस्नी कंपनीने (Reliance – Disney Deal) आपला भारतातील व्यवसाय मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला विकण्याचा घाट घातला आहे. आणि हा करार अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातंय.

तसं झालं तर स्टारच्या सगळ्या भारतातील वाहिन्या (Reliance – Disney Deal) या रिलायन्स जिओमध्ये विलिन होतील. डिस्नी स्टारचं भारतातील कंपन्यांचं मूल्यांकन १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास आहे. आणि रिलायन्स यात ५० टक्क्यांच्या वर वाटा खरेदी करणार आहे.

डिस्नी कंपनीकडे स्टारची खूपच छोटी हिस्सेदारी राहील. मनोरंजन विश्वातील (Reliance – Disney Deal) हा एक मोठा करार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा पुढील महिन्यात होईल, अशी शक्यता आहे. कराराचे आणखी तपशील सध्या उपलब्ध नाहीत. हा करार विलिनीकरणाचा असेल असा अंदाज मात्र आहे. आणि डिस्नी भारतीय कंपनीतील आपली छोटी का होईना पण हिस्सेदारी कायम ठेवण्याच्या तयारीत आहे, असंही बोललं जातंय.

(हेही वाचा – Maharashtra Politics : पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून शिंदे गटात नाराजी)

अंबानी यांची मनोरंजन विश्वातील मुसंडी

यापूर्वी रिलायन्सने २०१४ नंतर नेटवर्क १८ आणि वायकॉम १८ च्या (Reliance – Disney Deal) सर्व वाहिन्या विकत घेतल्या होत्या. ई टीव्ही तयार करत असलेला कन्टेन्टही कंपनी यापूर्वी विकत घेतला होता. नेटवर्क १८च्या वृत्त वाहिन्या आणि कलर्स सह इतर मनोरंजन वाहिन्याही रिलायन्सने विकत घेतल्या. हे कंपनीचं या क्षेत्रातील पहिलं पाऊल होतं.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करताना कंपनीने (Reliance – Disney Deal) एचबीओकडे असलेलं बरंचसं कॉन्टेन्ट अलीकडे विकत घेतलं. यापूर्वी स्टारशी एचबीओची भागिदारी होती. ती मोडीत निघाली.

यंदा क्रीडा स्पर्धांच्या थेट प्रसारणातही रिलायन्सने (Reliance – Disney Deal) उडी घेतली. आणि आयपीएल या लोकप्रिय लीगचे प्रसारणाचे हक्क विकत घेतले. जिओ सिनेमा या ओटीटी ॲपवर आयपीएल सामने मोफत दाखवण्यात आले. आता कंपनी आपली क्रीडा वाहिनी काढण्याच्या प्रयत्नांत आहे. डिस्नीबरोबरचा करार हा त्याचाच एक प्रयत्न असू शकतो.

याउलट डिस्नी कंपनीने (Reliance – Disney Deal) तोटा सहन करूनही भारतीय बाजारपेठ इतक्या वर्षांत सोडली नव्हती. सध्या एकदिवसीय विश्वचषकाच्या प्रसारणाचे हक्कही त्यांच्याकडे आहेत. आणि तिथे कंपनीने प्रेक्षकांचे नवनवीन विक्रम मोडले आहेत. डिस्नी कंपनीसाठी अजूनही भारत ही महत्त्वाकांक्षी बाजारपेठ आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.