Reliance JioSpaceFiber : रिलायन्सने सुरू केली उपग्रहावर आधारित ब्रॉडबँड सेवा

रिलायन्स कंपनीने आपली उपग्रहावर आधारित जिओस्पेसफायबर ब्रॉडबँड सेवा देशभरात सुरू केली आहे. इंटरनेटच्या दरात यामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे

139
Reliance JioSpaceFiber : रिलायन्सने सुरू केली उपग्रहावर आधारित ब्रॉडबँड सेवा
Reliance JioSpaceFiber : रिलायन्सने सुरू केली उपग्रहावर आधारित ब्रॉडबँड सेवा

ऋजुता लुकतुके

रिलायन्सने अलीकडेच्या आपल्या जिओस्पेसफायबर (Reliance JioSpaceFiber) या उपग्रह ब्रॉडबँड सेवेची घोषणा केली आहे. देशभरात ही सेवा उपलब्ध असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. देशातील ही पहिली उपग्रहावर आधारित गिगाफायबर सेवा आहे. या उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवेमुळे देशातील आतापर्यंत इंटरनेट न पोहोचलेल्या जागांमध्येही आता वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकेल.

याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी नुकतंच कंपनीने गुजरातमधील गीर, छत्तीसगडमधील कोरबा, ओडिशातील नवरंगपूर आणि आसाममधील जोरहाट ही चार ठिकाणं एकमेकांशी जोडून दाखवली. अर्थात, माध्यम होतं ते जिओस्पेसफायबरचं.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे संचालक आकाश अंबानी यांनी या प्रकल्पाची माहिती देताना, या सेवेमुळे इंटरनेट सेवा देशभर विस्तारली असल्याचं सांगितलं. ‘रिलायन्स कंपनी आधीही देशातील मोठी इंटरनेट सेवा देणारी कंपनी होती. आता जिओस्पेसफायबरमुळे आणखी काही दशलक्ष लोकांना इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. आणि रिलायन्स सेवेचाही विस्तार होईल,’ असं आकाश यांनी मीडियाला सांगितलं.

(हेही वाचा-BMC : अखेर महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने २ हजार संगणकांची खरेदी)

जिओस्पेसमुळे (Reliance JioSpaceFiber) ग्रामीण भागातील लोकही डिजिटल समाजाचा भाग होऊ शकतील, असा आशावाद आकाश यांनी व्यक्त केला. या सेवेचे नवीन दर मात्र एवढ्यात उघड करण्यात आलेले नाहीत.

रिलायन्स जिओस्पेसफायबर कसं काम करेल?

हे तंत्रज्ञान वायरलेस ५जी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या साठी कसलीही जोडणी आवश्यक नाही. ग्राहकांना प्लग-अँड-प्ले ब्रॉडबँड राऊटर मात्र घ्यावा लागेल. यात कुठलीही वायर किंवा केबल नसेल. तसंच ऑप्टिकल फायबरचा उपयोग करण्याचीही गरज नाही.

तुमच्याकडे असलेला ५जी राऊटर थेट उपग्रहाकडून इंटरनेट सिग्नल घेईल. आणि तुम्हाला ५जी सेवा मिळू शकेल. या इंटरनेट सेवेचा वेगही जास्त असेल. आताची जिओ फायबर सेवा १ जीबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा पुरवते. तर नवीन स्पेसफायबर सेवा १.५ जीबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या ग्रामीण भागातही आता ५जी सेवा उपलब्ध होईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.