-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन इमिग्रेशन विभागाने एक मोठा अडडेट जारी करताना स्थलांतरित कामगारांना ५ वर्ष मुदतीचं रोजगार कार्ड देणार असल्याचं म्हटलंय. यामुळे ग्रीन कार्डाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीयांचा फायदा होणार आहे. अमेरिकन इमिग्रेशन विभागाने काही स्थलांतरित लोकांना ५ वर्ष मुदतीचं रोजगार कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कार्डाच्या प्रतिक्षेत असलेल्या काही लोकांनाही अशीच कार्डं मिळणार आहेत. या कार्डांची आधीची मुदत एक वर्षाची होती. त्यामुळे अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला असलेल्या लोकांना काही कामासाठी भारतात जायचं असेल तर ते आता निर्धोक जाऊ शकतील. (US Employment Card)
अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक या कार्डांना ईएडी कार्ड असं म्हणतात. त्याशिवाय अमेरिकेत नोकरी करता येत नाही. पण, या कार्डाची मुदत पूर्वी एक वर्षाची होती. आता ती वाढवल्यामुळे तिथे रोजगार करणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. आकडेवारी असं सांगतो की, १०.५ लाख भारतीय सध्या अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी आवश्यक असलेलं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहेत आणि यातले ४ लाख लोक हे ज्येष्ट नागरिक आहेत. आणि ग्रीन कार्ड मिळण्यात आणखी दिरंगाई झाली तर तोपर्यंत त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो. (US Employment Card)
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : हमासला मोठा झटका; म्होरक्या झाला ठार)
ग्रीन कार्ड म्हणजे काय?
ग्रीन कार्ड हे अमेरिकेत कायम वास्तव्याचा हक्क मिळवून देणारं कार्ड किंवा परवाना आहे. दरवर्षी कुठल्या देशाच्या नागरिकांना किती ग्रीन कार्ड द्यायची याचा आगाऊ निर्णय अमेरिकन प्रशासन घेत असतं. आणि त्यानुसार, ग्रीन कार्ड त्या नागरिकाला बहाल करण्यात येतं. (US Employment Card)
रोजगारासाठी आवश्यक ग्रीन कार्डाच्या बाबतीत सध्या १.८ मिलियन आवेदनं अमेरिकन इमिग्रेशन विभागाकडे पडून आहेत. आणि तुंबलेल्या आवेदनांपैकी ६३ टक्के आवेदनं भारतातून तर १४ टक्के चीनमधून आलेली आहेत. अशावेळी ईएडी कार्डाची मुदत वाढली तर निदान या लोकांना मधल्या कालावधीत सुटी किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी निर्धोकपणे भारतात येता येईल. (US Employment Card)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community